मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता व दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखलं जातं. वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्याने क्षिती जोगबरोबर २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांची जोडी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. हेमंतने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोवर क्षितीने केलेली भन्नाट कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

हेमंत ढोमेने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत “नाही नाही म्हणत बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या! आपण कसं दिलवाला व्हायचं, बाकी होतंय की मग आपोआप!” असं हटके कॅप्शन दिलं आहे. यावर त्याची पत्नी क्षितीने मजेशीर कमेंट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : “कुत्रे नॉनव्हेज खायचे, मला व्हेज खायला लागायचं”; अर्जुन रामपालनं सांगितली ‘त्या’ दिवसांमधील व्यथा

हेमंतच्या फोटोवर कमेंट करत क्षिती म्हणते, “आता भावाकडून मागण्या नाही करणार पोरी तर कोणाकडून करणार…दादा म्हणून हट्ट पुरवायचे बहिणींचे” असं भन्नाट उत्तर देत अभिनेत्रीने मजेशीररित्या आपल्या पतीची बोलणी बंद केली आहे. क्षितीच्या कमेंटवर काही नेटकऱ्यांनी हसायचे इमोजी जोडले आहे.

हेही वाचा : “सर्व समस्या, अडचणी, आव्हानांचा…”, आईच्या वाढदिवशी सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला…

हेमंत ढोमेची पोस्ट

दरम्यान, हेमंत ढोमेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘झिम्मा’, ‘चोरीचा मामला’, ‘बघतोस काय मुजरा कर’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. नाटक, चित्रपट अशा सगळ्या माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.