मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखलं जातं. आजवर तिने अनेक नाटकं, चित्रपट व मालिकांमध्ये काम केलेलं आहे. आज अभिनेत्री तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. इंडस्ट्रीमध्ये तेजस्विनीचे अनेक मित्र-मैत्रिणी आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावने खास पोस्ट शेअर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“माझी तेजू, माझी सखी, माझी बहीण, माझी मैत्रीण… तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! तुझ्याबरोबर मला असाच वेडेपणा करायला आयुष्यभर आवडेल. एक वेगळीच मजा येते. आय लव्ह यू…आयुष्यभर अशीच हसत रहा आणि माझ्याबरोबर कायम राहा” अशी पोस्ट शेअर करत नम्रताने तेजस्विनीचा एक मजेशीर व्हिडीओ या पोस्टबरोबर शेअर केला आहे.

हेही वाचा : “तब्बल ८ तास विलंब”, नामांकित विमान कंपनीवर मराठी अभिनेत्री संतापली; म्हणाली, “कारवाई…”

नम्रता आणि तेजस्विनी पंडित यांची अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात या मैत्रिणी एकत्र झळकल्या होत्या. नम्रताने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. दोन आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये असलेलं हे सुंदर बॉण्डिंग पाहून युजर्स देखील भारावले आहेत.

हेही वाचा : ठरलं तर मग : अर्जुनच्या हाती लागला मोठा पुरावा, साक्षीचा डाव फसणार? सुरू होतोय मालिकेचा महासप्ताह, पाहा प्रोमो

नम्रता संभेरावप्रमाणे सई ताम्हणकरने सुद्धा तेजस्विनीसाठी खास पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये, “वाढदिवसाच्या शुभेच्छा माखनलाल जीयो!” असं लिहिलं आहे. याशिवाय प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी सुद्धा तेजस्विनीसाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “भय इथले संपत नाही…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुईने गायलं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं गाणं, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

दरम्यान, तेजस्विनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने ‘अगं बाई अरेच्छा!’ या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. यामध्ये तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. गेल्या काही वर्षांमध्ये तिने ‘तू ही रे’, ‘येरे येरे पैसा’, ‘देवा’ या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय नम्रता संभेरावबद्दल सांगायचं झालं, तर सध्या अभिनेत्री तिच्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १९ कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. यामध्ये नम्रतासह मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, सुप्रिया पाठारे आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.