‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं पुढे काय होणार असा सीक्वेन्स चालू होता. अखेर या दोघांनी मधुभाऊंच्या केसचा निकाल लागेपर्यंत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सायली-अर्जुन पुन्हा एकत्र आल्यामुळे प्रियासमोरच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून प्रिया अर्जुनशी लग्न करण्याचं स्वप्न बघत असते. तर, दुसरीकडे मित्राला दिलेल्या शब्दाप्रमाणे चैतन्य साक्षीबरोबर प्रेमाचं नाटक करत असतो.

साक्षी खरं सत्य अर्जुन-सायलीने चैतन्यसमोर उघड केल्यावर सगळे मिळून साक्षीला लवकरात लवकर धडा शिकवायचा असा निर्णय घेतात. त्यामुळे चैतन्य साक्षीच्या अनुपस्थितीत तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करत असतो. अशातच चैतन्यच्या हातात साक्षीविरोधात आता एक मोठा पुरावा लागणार आहे. हा पुरावा सापडल्यावर चैतन्य लगेच अर्जुन-सायलीकडे जातो.

हेही वाचा : शाहरुख खानची प्रकृती आता कशी आहे? जुही चावलाने दिली हेल्थ अपडेट; म्हणाली, “डॉक्टरांनी त्याला…”

“अर्जुन, मधुभाऊंच्या केसमध्ये साक्षीविरोधात खूप मोठी गोष्ट सापडलीये” असं सांगत चैतन्य फोनमधील काही पुरावे अर्जुनला दाखवतो. पुरावे पाहिल्यावर अर्जुन-सायलीला मोठा धक्का बसतो आणि साक्षीने कोर्टात सादर केलेले पुरावे खोटे होते असं अर्जुन त्यांना सांगतो. आता साक्षीचा खोटेपणा अर्जुन कसा उघड करणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहणार आहेत.

हेही वाचा : “भय इथले संपत नाही…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुईने गायलं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं गाणं, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

हेही वाचा : “घाणेरडी कॉमेडी करून गलिच्छ सिनेमा करायचा”, आनंद इंगळेंनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “तो विशिष्ट काळ…”

दरम्यान, लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर मनोरंजनाचा महासप्ताह चालू होणार आहे. २७ मे पासून ८.३० वाजता रोज मालिकेचे विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता साक्षीचा खोटेपणा कोर्टात सिद्ध होणार का? तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुभाऊंची सुटका होईल का? आणि सुटका झाल्यास पुढे अर्जुन-सायलीच्या नात्याचं काय होणार याचा उलगडा आगामी भागांमध्ये करण्यात येणार आहे. सध्या वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात.