खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या दमदार कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेला सुटकेचा थरार पाहायला मिळत आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा प्रिमिअर सोहळा पार पडला होता. या सोहळ्याने अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. हा चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवारांनी अमोल कोल्हेंचे भरभरुन कौतुक केले.
आणखी वाचा : “…पण शिवाजी पुन्हा होणे नाही” बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटाला तगडी टक्कर देणारा ‘हर हर महादेव’चा ट्रेलर प्रदर्शित

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

विशेष म्हणजे शरद पवारांनी ट्वीटरवर याबद्दल एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात त्यांनी चित्रपट बघतानाचा एक फोटो शेअर केला आहे. “खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या आगामी चित्रपटाचे प्रीमियर सादरीकरण काल पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे, कौशल्याचे आणि तल्लख बुद्धीमत्तेचे यथायोग्य वर्णन चित्रमाध्यमात करण्यात आले आहे.”

“डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह चित्रपटातील सर्व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट भूमिका केली आहे. सर्व कलावंतांचे परिश्रमपूर्वक सकस चित्रपट निर्मिती केल्याबद्दल अभिनंदन व यशस्वीतेसाठी शुभेच्छा!” असे शरद पवार म्हणाले.

आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

दरम्यान हा चित्रपट विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि अभिनय अशी तिहेरी जबाबदारी डॉ. अमोल कोल्हे यांनी पेलली आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मोगल बादशाह औरंगजेब आणि अभिनेत्री मनवा नाईक ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सोयराबाई मोहिते या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जगदंब क्रिएशन’ आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. तर दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.

Story img Loader