Pooja Sawant and Siddesh Chavan Wedding : महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. यानंतर पूजाच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली होती. अखेर फेब्रुवारी महिन्यात पूजा आणि सिद्धेशच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात होऊन आज ( २८ फेब्रुवारी ) ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अभिनेत्रीच्या लग्नाला जवळच्या कुटुंबीयांसह सिनेविश्वातील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

पूजा आणि सिद्धेशच्या लग्नसोहळ्यातील पहिला लूक आता समोर आला आहे. या दोघांनी जोडीने माध्यमांसमोर उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने हिरवा चुडा, भरजरी दागिने व लाल रंगाची साडी नेसली होती. तर, सिद्धेशने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. सध्या दोघांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : ना पिवळा, ना लाल…; हळदीच्या दागिन्यांसाठी पूजा सावंतने निवडला पांढरा रंग, ‘त्या’ खास गोष्टीने वेधलं लक्ष

पूजा आणि सिद्धेशचं लग्न हे अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं होतं. अभिनेत्रीचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. अभिनेत्रीने तिच्या आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल सर्वप्रथम गश्मीर महाजनीची बायको गौरीला सांगितलं होतं. यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जोडीदाराबरोबर फोटो शेअर करत पूजाने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. गेल्या काही दिवसांपासून पूजाच्या मेहंदी, साखरपुडा, हळदी समारंभातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : “आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श उदाहरण…”, सलील कुलकर्णींनी केलेल्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक

दरम्यान, पूजा आणि सिद्धेशवर आता मराठी कलाविश्वातूल शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तिच्या लग्नाला अभिजीत व सुखदा खांडकेकर, प्रार्थना बेहेरे व तिचा पती अभिषेक जावकर, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर या सगळ्यांनी खास उपस्थिती लावली होती.