पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांनी २८ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाला जवळच्या कुटुंबीयांसह सिनेविश्वातील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. साखरपुडा, हळद, मेहंदी, संगीत असे पूजा सावंतच्या लग्नसोहळ्यातील सगळेच कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. अशातच तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने शेअर केलेल्या एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रार्थनाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पती अभिषेक जावकरबरोबर मिळून पूजा-सिद्धेशची लग्नगाठ बांधत असल्याचं पाहायला मिळत आहे. “नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली…” असं कॅप्शन प्रार्थनाने या फोटोंना दिलं आहे. याशिवाय लाडक्या मैत्रिणीच्या लग्नातील खास क्षणांबद्दल अभिनेत्रीने स्वत: मीडियासमोर सांगितलं आहे.

हेही वाचा : Video : गुडन्यूज दिल्यावर जामनगरमध्ये दीपिकाचं जोरदार स्वागत, चाहत्यांनी घेरल्यावर बायकोला सांभाळताना दिसला रणवीर सिंह

पूजाचं लग्न लागल्यावर प्रार्थनाने नवऱ्यासह माध्यमांसमोर उपस्थिती लावली होती. यावेळी पूजाचं लग्न कसं पार पडलं? असा प्रश्न प्रार्थनाला विचारण्यात आला. यावर, “खूप मस्त पार पडला… एका क्षणाला आम्ही सगळेच भावुक झालो होतो.” असं अभिनेत्रीने सांगितलं. याशिवाय सुखदा खांडकेकरने देखील हळदी समारंभातील काही भावुक क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रार्थना बेहेरे

हेही वाचा : सई ताम्हणकर पुन्हा गाजवणार बॉलीवूड! ‘भक्षक’नंतर आता ‘डब्बा कार्टेल’मध्ये झळकणार, पहिली झलक आली समोर

दरम्यान, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर फोटो शेअर करत पूजा सावंतने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. यानंतर अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली होती. अखेर सगळे कार्यक्रम विधीवत पार पडल्यावर २८ फेब्रुवारीला पूजा लग्नबंधनात अडकली.