मराठी रंगभूमी व सिनेसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारा आणि सध्याचा आघाडीचा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थने आपल्या जबरदस्त अभिनयाने, विनोदी शैलीने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सिद्धार्थने आपल्या अभिनयाची छाप हिंदी सिनेसृष्टीतही उमटवली आहे. अशा हा हरहुन्नरी अभिनेत्याचा एक चित्रपट ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये दाखवण्यात आला. ही अत्यंत अभिमानस्पद बाब आहे. यासंदर्भात सिद्धार्थने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

बहुचर्चित असा ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’ सध्या जोरदार सुरू आहे. १४ मेपासून सुरू झालेला ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ २५ मेपर्यंत असणार आहे. या फेस्टिव्हलला अनेक दिग्गज कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. काल, बॉलीवूडची सौंदर्यवती, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन कानच्या रेड कार्पेटवर अवतरली. तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या तिचे कानमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – रुग्णालयात दाखल राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल माहिती; म्हणाली, “गर्भाशयात ट्यूमर असून…”

कालच ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सिद्धार्थ जाधवचा ‘हजार वेळा शोल पाहिलेला माणूस’ चित्रपट दाखवण्यात आला. तसंच १९ मेला देखील दाखवण्यात येणार आहे. यासंदर्भात पोस्ट करत सिद्धार्थने लिहिलं,” #आपलामराठीसिनेमा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’बद्दल खूप वेळा ऐकलं होतं. जेव्हा जेव्हा इथे आपला ‘मराठी सिनेमा’ गेलाय तेव्हा तेव्हा अभिमान वाटायचा. ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग होत आहे आणि मी त्या सिनेमाचा भाग आहे. खूप आनंद झाला आहे.”

पुढे सिद्धार्थ लिहिलं, “‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जिथे जगभरातून गौरविलेले सिनेमे येतात आणि बघितले जातात…तिथे आपल्या ‘मराठी सिनेमाचं स्क्रीनिंग होत आहे याचा मला खूप आनंद आहे…धन्यवाद ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ चित्रपटाची टीम. खूप छान वाटतंय. असंच प्रेम ठेवा. हा सिनेमा लवकरात लवकर तुमच्यासमोर सादर व्हावा याची मी आतुरतेने वाट पाहतोय…लव्ह यू…थँक्यू…”

हेही वाचा – Video: ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत जबरदस्त वळण, खोट्या अर्जुन मागचा मास्टमाईंड आहे ‘हा’ चेहरा

सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव केला होतं आहे. दरम्यान, ‘कान फिल्म फेस्टिव्हल’साठी अभिनेत्री छाया कदम काही दिवसांपूर्वी मुंबईतून रवाना झाल्या. त्यांचा विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.