बॉलिवूड अभिनेत्रींची स्टाईल, त्यांचे कपडे हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्या काय परिधान करतात, कोणत्या ब्रँड्सना त्यांचं प्राधान्य असतं, त्यांच्या नेलपेंटपासून ते लिपस्टिकपर्यंत, हिल्सपासून ते बॅग्सपर्यंत सगळ्यांची चर्चा फॅशन वर्ल्डमध्ये होते. किंबहुना याच गोष्टींवरून त्या किती ‘स्टाईलिश’ आहेत हे ठरतं. आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमी चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नेहा धुपिया. नुकतीच ती ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटात दिसली. त्या चित्रपटात नेहाच्या स्टाईल स्टेटमेंटची खूपच चर्चा रंगली. ‘पण, मी या इंडस्ट्रीत नवखी होते त्यावेळी नेहमीच प्रियांका चोप्राची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करायचे, ते मला कधीही जमायचं नाही उलट तिची स्टाईल कॉपी करण्याच्या नादात मीच मूर्ख दिसू लागली असं नेहानं नुकतंच एका मुलाखतीत कबुल केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : ‘नागिन’ फेम अभिनेत्रीचे डेबिट कार्ड चोरीला; २ लाखांचा लावला चुना

वाचा : ‘पद्मावत’चा विरोध करण्यासाठी जवानांनी अन्नत्याग करावा , करणी सेनेची अजब मागणी

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या अभिनय कौशल्यासोबतच त्यांच्या फॅशन सेन्सचीही खूप चर्चा असते. अभिनेत्री कशा प्रकारचे कपडे परिधान करतात त्याची छाप नक्कीच त्यांच्या फॉलोअर्सवरही पडत असते. ‘पण पूर्वी मी प्रियांका चोप्राची स्टाईल फॉलो करण्याचा खूप प्रयत्न केला असं नेहा धुपियानं हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं. मी नवखी असल्यानं मला फॅशनबद्दल फारसं काही कळायचं नाही, याच इंडस्ट्रीत काम करणाऱ्या इतर अभिनेत्री काय परिधान करतात, कसा मेकअप करतात यावर मी लक्ष ठेवायचे, मी सतत माझी आणि त्यांची तुलना करायचे. एखाद्या अभिनेत्रींनं सोनेरी रंगाची साडी नेसली तर मीही दुसऱ्या दिवशी सोनेरी रंगाची साडी नेसून कार्यक्रमांना जायचे. पण, दुसऱ्यांची स्टाईल कॉपी करण्याच्या नादात मी मूर्ख दिसू लागले. त्यावेळी मी फक्त २१ वर्षांची होते आणि तो माझा उमेदीचा काळ होता, त्यामुळे मला फारसं काही कळायचं नाही. पण आता मात्र मी सुजाण झाले आहे त्यामुळे कसं राहावं, काय परिधान करावं हे मला कळू लागलं’ असंही ती म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha dhupia reveals she used to copy other female stars from bollywood
First published on: 22-01-2018 at 10:31 IST