बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत अभिनयासह तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती अनेक विषयांवर तिची मतं मांडत असते. लवकरच तिचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. प्रेक्षक कंगनाच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतंच कंगनाने एका मुलाखतीदरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल भाष्य केलं आहे.

सध्याचे सगळेच ओटीटी प्लॅटफॉर्म हे अजिबात नफा कमवत नसून त्यांची अवस्था फारच बिकट असल्याचं कंगनाने सांगितलं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे कलाकारांना एक नवा मंच मिळाला आहे जिथे प्रेक्षकांच्या वयाचं बंधन नाहीये. ओटीटी प्लॅटफॉर्म हे अभिनेत्यांसाठी एक माध्यम आहे की नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना कंगनाने या प्लॅटफॉर्मची वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली.

A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
lok sabha elections 2024
एनडीएत जागावाटपावरून ‘हे’ दोन मित्रपक्ष नाराज; मोदींची साथ सोडून इंडिया आघाडीत जाणार?
house burglar
नवी मुंबई : अल्पवयीन असल्यापासून घरफोडी… अट्टल आरोपीला अटक 

आणखी वाचा : ‘RRR’मधील आठ मिनिटांच्या कॅमिओसाठी अजय देवगणणे घेतलेलं ‘इतक्या’ कोटींचं मानधन; रक्कम ऐकून व्हाल थक्क

‘टीव्ही ९ भारतवर्ष’शी संवाद साधताना कंगना म्हणाली, “तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मची फार वेगळी प्रतिमा लोकांसमोर रंगवत आहात, त्यांची अवस्था वाटते तितकी चांगली नाही. कोविड काळात या प्लॅटफॉर्मची चलती होती, कारण बऱ्याच लोकांना हे एक उत्तम माध्यम आहे असं वाटत आहे. कोविडनंतर या ओटीटी प्लॅटफॉर्मना उतरती कळा लागली आहे. मी हे छातीठोकपणे सांगू शकते की आजच्या घडीला सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म हे तोट्यात आहेत.”

इतकंच नव्हे तर यावर उपायदेखील कंगनानेच सांगितला आहे. कंगना म्हणाली, “हे ओटीटी प्लॅटफॉर्म कोणत्या दिशेने जात आहेत हे मला ठाऊक नाही, परंतु त्यांची बजेट कमी केली पाहिजेत, हे सगळे प्लॅटफॉर्म सध्या पॅनिक मोडमध्ये काम करत आहेत. आपण त्यांना आणखी वेळ द्यायला हवा, परंतु चित्रपटव्यवसाय हा वेंटीलेटरवर आहे हे मात्र नक्की.” एकापाठोपाठ चित्रपट फ्लॉप झाल्यावर कंगनाच्या ‘इमर्जन्सी’कडे लोकांच्या नजरा आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.