‘बिग बॉस ओटीटी’ विजेती दिव्या अग्रवाल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दिव्या आणि तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर यांचा साखरपुडा २०२२ मध्ये पार पडला. २० फेब्रुवारी रोजी दिव्याच्या चेंबूर येथील घरी दोघे लग्नगाठ बांधणार आहेत.

दिव्याने लग्नाची बातमी दिल्यापासून ती चर्चेत आहे. दिव्याने तिच्या लग्नाबाबत एक रंजक गोष्ट शेअर केली आहे. इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दिव्या म्हणाली, “आम्ही घरीच लग्न करणार आहोत आणि या निर्णयाचा आम्हाला खूप अभिमान आहे. जसे सगळे लग्न करतात तसं लग्न आम्हाला करायचं नाही. लोक ५ स्टार हॉटेल बूक करतात आणि लग्नसोहळ्यातील सर्व विधी बॅक्वेट्स आणि पूलजवळ करतात. पण मला खरंच काहीतरी वेगळं करायचं होतं. मला एक वेगळा अनुभव हवा होता.”

हेही वाचा… अबू धाबीतील पहिल्या हिंदू मंदिरात अक्षय कुमारने घेतले दर्शन; पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालंय लोकार्पण

दिव्याच्या लग्नाच्या विधी १८ तारखेपासून संगीत सोहळ्याने सुरू होतील. त्यानंतर १९ ला मेहंदी आणि २० तारखेला दिव्याच्या घरी लग्न या प्रकारे संपूर्ण सोहळा पार पडणार आहे. आयुष्यातल्या या आनंदाच्या प्रसंगी दिव्याला तिच्या वडिलांची खूप आठवण येते असं तिने नमूद केलं. “मी कधी आनंदी असते तर कधी दुःखी असते कारण या क्षणाला मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते. मी खूप भावनिक आहे पण नवीन वाटचालीसाठी खूप आनंदीही आहे.”

लग्नाच्या तयारीबद्दल सांगितल्यानंतर दिव्याने तिचा लग्नातला लूक कसा असेल याबाबत खुलासा केला. पिवळा, हिरवा आणि पेस्टल रंगाचा कलर कोड त्यांच्या लग्नात असणार आहे. “आम्ही लाल आणि जांभळ्या रंगाचा कलर पॅलेट निवडला आहे. सूर्यास्ताच्या वेळेस आमचे फेरे होणार आहेत. आम्ही अद्याप लग्नाचे कपडे पाहिलेले नाहीत, परंतु आम्ही खूप उत्साही आहोत,” असं दिव्या म्हणाली.

हेही वाचा… पूनम पांडेचे मृत्यूचे खोटे नाटक तिच्या एक्स पतीलाही भोवणार, दोघांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा गुन्हा दाखल

दरम्यान दिव्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झाल्यास दिव्या अग्रवाल आणि वरूण सूद ‘एस ऑफ स्पेस’ दरम्यान प्रेमात पडले परंतु त्यांचं ब्रेकअप झालं. त्यांनंतर काही महिन्यांनी डिसेंबरमध्ये दिव्या आणि अपूर्व यांनी साखरपुडा केला. अपूर्व हा व्यावसायिक आहे.

Story img Loader