‘पंचायत ३’ ही यंदाच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिजपैकी एक आहे. दोन वर्षांनंतर या सीरिजचा तिसरा सीझन २८ मे रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. या सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिसऱ्या सीझनमध्ये एकूण आठ एपिसोड्स आहेत. ही वेब सीरिज सध्या ओटीटीवर ट्रेंड करत आहे.

जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, फैजल मलिक, रघुबीर यादव आणि चंदन रॉय यांच्या या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सीरिजमध्ये ‘प्रल्हाद चा’ ही भूमिका करणाऱ्या फैजल मलिक यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फैजल यांनी कंगना राणौतच्या राजकारणात येण्याबाबत त्यांचं मत व्यक्त केलं आहे. कलाकारांनी राजकारणात येऊ नये, अभिनय करावा, असं ते म्हणाले.

“तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या”, दलजीतने केलेल्या आरोपांवर दुसऱ्या पतीने सोडलं मौन; म्हणाला, “तिचा मुलगा…”

कंगना राणौतच्या राजकारणाबद्दल काय म्हणाले फैजल मलिक?

‘टीव्ही ९’ला दिलेल्या मुलाखतीत फैजल मलिक म्हणाले, “कंगना राणौत खूप चांगली आहे. पूर्वी ती अशी नव्हती, आता वाटतंय जणू ती वेगळीच कोणीतरी आहे. मला असं वाटतं की एखाद्या कलाकाराचं काम अभिनय करण्याचं असेल तर त्याने फक्त तेच केलं पाहिजे आणि इतर गोष्टी करू नयेत. कंगनाची बहीण रंगोली मला ओळखते. आम्ही एकत्र काम केले आहे. दीड वर्ष एकाच ऑफिसमध्ये काम केलं, तो एक चांगला अनुभव होता.”

एकेकाळी आमिर खानचा बॉडीगार्ड होता ‘हा’ अभिनेता, बारटेंडर म्हणूनही केलं काम, आता…

“कंगना राणौत उत्तम अभिनेत्री आहे, पण मला वाटतं की ती इतक्या मेहनतीने जी गोष्ट शिकली आहे, त्यावर तिने लक्ष केंद्रित करावं. तिने बॉलीवूड सोडू नये आणखी काम करावं,” असं मत फैजल मलिक यांनी व्यक्त केलं.

अवघ्या १० महिन्यांत मोडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुसरं लग्न; पतीच्या अफेअरबद्दल स्क्रीनशॉट्स केले शेअर

कलाकारांनी राजकारणात येऊ नये – फैजल मलिक

“कलाकारांनी राजकारणात येऊ नये. कारण राजकारण करणे हे राजकारण्यांचे काम आहे. राजकारण हे सतत २४/७ चालणारे काम आहे. राजकारणासाठी एक कार्यकर्ता वर्षानुवर्षे काम करतो आणि त्याला हटवून मुंबईतून एक व्यक्ती आणली जाते आणि तिकीट दिलं जातं, त्यामुळे त्या कार्यकर्त्याचं मन नक्कीच दुखावतं. तो कार्यकर्ता त्या शहरातील त्या लोकांमध्ये फिरलेला असतो, त्यांचा कार्यकर्ता तोच असतो. लोकांच्या शिव्या कोण खातंय, कार्यकर्ता खातोय. मग अचानक तुम्ही हिंदी चित्रपटसृष्टीतून कोणालातरी आणता आणि त्याला म्हणता की तू खासदार हो. हे सगळं बरोबर नाही, कारण खासदार नेहमी त्या कार्यकर्त्यांनी व्हायला पाहिजे, जो लोकांच्या समस्या समजून घेतो,” असं फैजल मलिक म्हणाले.