संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी- द डायमंड बाजार’ या वेब सीरिजने सध्या सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलंय. या सीरिजमधील सेट, गाणी, कपडे आणि दागिने यांच्या भव्यतेने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातलीय. हीरामंडीची कास्टदेखील तितकीच कणखर आहे. यातलीच प्रेक्षकांचं मन जिंकणारी एक भूमिका म्हणजेच बिब्बोजान.

अभिनेत्री अदिती राव हैदरीने या वेब सीरिजमध्ये बिब्बोजानची भूमिका अगदी चोख बजावली आहे. तिच्या अभिनयापासून ते नृत्य कौशल्यापर्यंत बिब्बोजानने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. बिब्बोजानचा गजगामिनी वॉकदेखील सध्या ट्रेंडिंग आहे आणि तो सोशल मीडियावरदेखील तुफान व्हायरल होतोय. अदितीच्या या भूमिकेला जेवढं प्रेम मिळालं तेवढेच तिचे जुने फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

हेही वाचा… VIDEO: लंडनमध्ये पतीबरोबर फिरताना व्हिडीओ काढणाऱ्यावर भडकली कतरिना कैफ, नेटकरी म्हणाले…

अदितीचं सौंदर्य प्रेक्षकांना भारावून टाकणारं आहे. पण, याच सौंदर्यावर अनेकांनी तिला आता ट्रोल केलंय. सध्या अदितीचे जुने फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायत. अदितीच्या आधीच्या आणि आताच्या फोटोंमध्ये खूप फरक असल्याने प्रेक्षक अवाक् झाले आहेत. अदितीचा फोटो व्हायरल होताच अनेकांनी तिच्या परिवर्तनासाठी कौतुक केलंय, तर काहींनी तिला ट्रोल केलंय.

अदितीचा हा फोटो पहिल्यांदा एक्स अकाउंटवरून व्हायरल झाला. या फोटोला युजरने कॅप्शन दिलं होतं की, “अदितीमध्ये एवढा बदल झालाय? यासाठी हिने नक्की काय खाल्लं असावं?”

हेही वाचा… “ओ सजनी रे…”, ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरांना पडली ‘लापता लेडीज’च्या गाण्याची भुरळ, व्हिडीओ व्हायरल

या फोटोमध्ये असं दिसून येतंय की, अदितीच्या चेहऱ्यामध्ये खूप बदल झालाय. तिचं नाक, डोळे, ओठ सगळ्यातच थोडा फार फरक दिसून आला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तर्कवितर्क लावायला सुरुवात केली. व्हायरल झालेल्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “प्लास्टिक सर्जरी केली आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं, “मला वाटलं होतं ही नॅचरल ब्युटी आहे, पण हिचं सौंदर्यपण खोटंच आहे.” तर अनेकांनी हा प्रश्न विचारला की, “या दोघी एकच व्यक्ती आहेत असं वाटतंच नाही.” “तिला सर्जन खूप चांगला भेटला आहे”, असंही अनेकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘हीरामंडी- द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये अदिती राव हैदरीसह मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्ढा, संजीदा शेख, फरदीन खान, ताहा शाह आदी कलाकार आहेत. या वेब सीरिजचा पहिला सीजन १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.