Mirzapur 3 Release Date: अभिनेते पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी आणि रसिका दुग्गल यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली वेब सीरिज ‘मिर्झापूर ३’ची जोरदार चर्चा सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या यशानंतर आता ‘मिर्झापूर ३’ सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्राइम व्हिडीओ’वर ‘मिर्झापूर ३’ सीरिज कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार, यासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून अनेक वृत्त समोर आली आहेत. पण आता जी प्रदर्शनाची तारीख सांगितली जात आहे, हे वाचून ‘मिर्झापूर’ सीरिजच्या चाहत्यांना आनंद होईल.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Mirzapur 3 web series Release Date announced with this hide
कालीन भैय्या आणि गुड्डू पंडितची आतुरतेने पाहताय वाट, तर ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाची तारीख दडलीये ‘या’ फोटोमध्ये, शोधा
Crime Thriller web Series on Disney plus Hotstar
एकाच OTT प्लॅटफॉर्मवर आहेत ‘या’ जबरदस्त ७ क्राइम-थ्रिलर वेब सीरिज, IMDB वर मिळालंय टॉप रेटिंग, वाचा यादी
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
heeramandi fame actress sanjeeda shaikh opens up on woman groped her
“माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “या घटनेमुळे…”
OTT release in this week
मेचा शेवटचा आठवडा असणार धमाकेदार, OTT वर येतायत जबरदस्त वेब सीरिज अन् चित्रपट, वाचा यादी!
crew on OTT
करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”

हेही वाचा – आईची साडी अन् नथ घालून Cannesला पोहोचल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, भावुक पोस्ट करत म्हणाल्या, “आई आज तू हवी होतीस…”

गुरुवारी ‘प्राइम व्हिडीओ’ने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत काही पोस्टर शेअर केले. या पोस्टरमधून प्रदर्शनाच्या तारखेबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. पण यानंतर लवकरच निर्मात्यांकडून ‘मिर्झापूर ३’च्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा होऊ शकते, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा – Video: राखी सावंतची यशस्वी झाली शस्त्रक्रिया, पूर्वाश्रमीच्या पतीने दाखवला ट्यूमर, खिल्ली उडवणाऱ्यांना दिला इशारा

‘इ टाइम्स’च्या वृत्तातून ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत माहित देण्यात आली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘मिर्झापूर ३’ सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. त्यामुळे सध्या ‘मिर्झापूर ३’ची जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – Video: पारू आणि आदित्यचं झालं लग्न! पण क्षणार्धात…; ‘पारू’ मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्यांचं वेधलं लक्ष

‘मिर्झापूर ३’मध्ये काय पाहायला मिळणार?

‘मिर्झापूर २’ सीरिजच्या शेवटी मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा)ला मारून गुड्डू पंडित (अली फजल) मिर्झापूरच्या खुर्चीवर बसतो आणि कालीन भैय्याला सोडून देतो. आता ‘मिर्झापूर ३’मध्ये कालीन भैय्या आपल्या खुर्ची आणि लेकाच्या मृत्यूचा बदला घेताना दिसणार आहे. त्यामुळे हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘मिर्झापूर ३’मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल व्यतिरिक्त विवान सिंह, ईशा तलवार, शाहनवाज प्रधान, राजेश तैलांग, शीबा चड्ढा, विजय शर्मा असे अनेक कलाकार पुन्हा एकदा जुन्या पात्रांमध्ये झळकणार आहेत.