प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता मोहित बघेल याचे निधन झाले आहे. तो केवळ २७ वर्षांचा होता. कर्करोगामुळे त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या शोचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ट्विट करुन मोहितच्या निधनाची बातमी दिली. मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले. मोहित मेरे भाई इतनी जल्दी क्या थी जाने की? मैंने तुझसे कहा था देख तेरे लिए सारी इंडस्ट्री रुक गयी है जल्दी से ठीक होके आजा उसके बाद ही सब काम शुरू करेंगे, तू बहुत अच्छी एक्टिंग करता है,इसलिए अगली फिल्म के सेट पे तेरा इंतज़ार करूँगा.और तुझे आना ही पड़ेगा ॐ साई राम #cancer RIP pic.twitter.com/FD2lE3tHJz — Raaj Shaandilyaa (@writerraj) May 23, 2020 One of the nicesttt people to work with! Happy, positive and motivated always. Love you Mohit. RIP #JabariyaJodi — Parineeti Chopra (@ParineetiChopra) May 23, 2020 मोहितचा जन्म उत्तर प्रदेशमधील एका गरीब कुटुंबात झाला होता. अभिनेता होण्यासाठी तो मुंबईत आला. त्याने 'छोटे मिया' या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला सलमान खानच्या 'रेडी' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्याने 'छोटे अमर चौधरी' ही भूमिका साकारली होती. त्याचा अभिनय पाहून सलमान खान देखील प्रचंड खुश झाला होता. परंतु आपल्या फिल्मी करिअरमध्ये आणखी यश मिळवण्याअगोदरच त्याचा प्रवास कायमचा थांबला.