हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच कलाकारांनी मोलाचं योगदान दिलं आहे. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता विनोद खन्ना. बॉलिवूडचा ‘अमर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनोद खन्ना यांची आज जयंती. या खास दिवशी चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. विनोदजी आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वामुळे ते कायम प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतील.

विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला होता. भारत- पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं.
खलनायकी भूमिकांना वेगळ्याच पद्धतीने रुपेरी पडद्यावर मांडण्याची सुरुवात करणाऱ्या खन्ना यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटानंतर त्यांनी सहायक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली. ‘हॅण्डसम हंक’, ‘डॅशिंग अभिनेता’, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा खलनायक आणि ‘सेलिब्रिटी संन्यासी’ म्हणून विनोद खन्ना यांची ओळख होती.

anant geete bhaskar jadhav dispute
शिवसेना ठाकरे गटात नाराजीनाट्य
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

सुरुवातीच्या दिवसांमध्ये चित्रपटसृष्टीत ते खलनायकी भूमिकांमध्ये बरेच रुळले. त्यानंतर १९७१ मध्ये त्यांनी ‘हम तूम और वो’ चित्रपटात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. विनोदजींनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर- अकबर- अँथनी’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची स्पर्धा असल्याचंही म्हटलं जात असत. पण, या दोन्ही अभिनेत्यांच्या मैत्रीच्या बळावर ही स्पर्धा कुठच्या कुठे पळाली. १९८२ मध्ये आपल्या कारकिर्दीत परमोच्च शिखरावर असतानाच खन्ना यांनी ओशो रजनीश या गुरुचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर थेट पाच वर्षांनी त्यांनी चित्रपसृष्टीत पुनरागमन केलं. अभिनयासोबतच ते राजकारणातही बरेच सक्रिय होते. १९९७ पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पंजाबमधील गुरुदासपुर भागात भाजपतर्फे निवडणूक लढवत ते खासदार पदावर निवडून आले होते.