करोना महामारी आणि त्यामूळे देशभरात सुरू केलेल्या लॉकडाउनमुळे लोकांची आर्थिक गणितं विस्कळीत झाली आहेत. चित्रपटसृष्टीला देखील याचा मोठा फटका बसला आहे. ‘निशांत’, ‘नजराना’, ‘बेटा हो तो ऐसा’ या सारख्या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री सविता बजाज यांच्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्याकडे आजारपणावर उपचार करण्यासाठी देखील पैसे नाहीत. दरम्यान अभिनेता सचिन पिळगावकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतीच सचिन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले, ‘मी वर्तमानपत्रांमध्ये सविता यांच्याविषयी वाचले. असोसिएशनच्या लोकांनी पुढे येऊन त्यांना मदत करावी. आर्टिस्ट आणि काही टेक्निशियन्स यांची देखील त्यांनी मदत करावी. जर तुम्ही CINTAA आणि IMPPAकडे मदत मागितली तर ते तुमची मदत नक्की करतील. त्यामुळे तुम्ही सदस्य असणे महत्वाचे आहे.’

Imtiaz Ali on Amar Singh Chamkila caste
चित्रपटात चमकीला यांच्या जातीचा वारंवार उल्लेख, इम्तियाज अली म्हणाले, “त्यामुळेच त्यांनी आपला जीव गमावला, कारण…”
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

आणखी वाचा : प्रवीण तरडे सांगणार बलुचिस्तानातील मराठ्यांची विजयगाथा; ‘बलोच’ चित्रपटाची घोषणा

पुढे सचिन म्हणाले, ‘हे पाहा दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे CINTAAकडे ही गोष्ट गेली नव्हती आणि दुसरी म्हणजे तुम्ही लोकं सेविग्ंस का ठेवत नाहीत? दुसऱ्यांकडे बोट दाखवणे सोपे असते. पण तुमच्या हे लक्षात येत नाही की जर एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवताय तर बाकी चार बोटं तुमच्याकडे असतात. मी कोणत्याही आर्टिस्टला ब्लेम करत नाही. पण आयुष्यात अशा अडचणी येत जात असतात. तुम्ही सेविंग्स ठेवायला हवी. कधीही काहीही होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला तुम्ही तयार असायला हवे.’

या मुलाखतीमध्ये सचिन यांनी पुढे दिग्गज अभिनेते भरत भूषण आणि ए के हंगल यांचे उदाहरण दिले आहे. तसेच तरुणांना देखील सेविंग्स करण्याचा सल्ला दिला आहे.

सविता बजाज यांनी आपण आर्थिक अडचणीत सापडल्याबाबत खुलासा मुलाखतीमध्ये केला. केवळ इतकंच नव्हे तर त्यांच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. जपून ठेवलेल्या पैशांवर आतापर्यंत त्यांनी कसेबसे दिवस काढले. परंतु आता त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच वाढत्या आजारपणाचा उपचार करण्यासाठी पैसेच उरले नाहीत. तीन महिन्यांपूर्वीच त्यांना करोनाने घेरले असल्याने २२ दिवसांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.