बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘आदिपुरुष’ असं आहे. हा चित्रपट रामायण या पौराणिक कथेवर आधारित आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात रावणाची मानवीय बाजू दाखवण्यात येईल अशी घोषणा सैफ अली खानने केली आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे सैफवर सध्या टीकेचा वर्षाव केला जात आहे.

अवश्य पाहा – ‘बिग बॉस १४’ जिंकणार कोण? या ४ स्पर्धकांना मिळालं अंतिम फेरीचं तिकिट

सैफ अली खान या चित्रपटात लंकेश अर्थात रावणाची भूमिका साकारणार आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफने या भूमिकेवर भाष्य केलं. तो म्हणाला, “रावणाला आजवर आपण केवळ खलनायच्या भूमिकेत पाहिलं आहे. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता? याचं चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रावणानं भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केलं हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याला देखील एक पार्श्वभूमी होती. रामाचे भाऊ लक्ष्मण यांनी सुर्पनखाचं नाक कापलं होतं. त्यानंतर हे युद्ध होणारच होतं. या चित्रपटात रावणची विचारसरणी काय होती हे दाखवलं जाणार आहे.”

अवश्य पाहा – ‘माझ्या यशाच्या आड येऊ नकोस, अन्यथा…’; एक्स बॉयफ्रेंडला पवित्राचा इशारा

‘आदिपुरुष’ या चित्रपटात अभिनेता प्रभास राम यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री कृती सेनन सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास ४०० कोटी रुपयांचं बजेट ठरवण्यात आलं आहे. युद्धाचे प्रसंग अधिकाधिक आकर्षक दिसावे यासाठी अमेरिकेतील काही खास तज्ञांची मदत घेतली जाणार आहे. २०२२मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.