मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेली मानहानीची तक्रार अन्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची अभिनेत्री कंगना राणावतची मागणी मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी फेटाळली होती. हा निर्णय सत्र न्यायालयाने शुक्रवारी योग्य ठरवला. 

आपल्याला या न्यायालयावर विश्वास नसल्याचा आरोप करत कंगनाने अख्तर यांची तक्रार अंधेरी येथील महानगरदंडाधिकाऱ्यांकडून अन्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. अख्तर हे बॉलिवूडमधील खंडणीखोर आहे, असा आरोप करून त्यांच्याविरोधात कंगनाने प्रतितक्रार केली होती. तीही अन्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची मागणी कंगनाने केली होती. मात्र मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी कंगनाची मागणी फेटाळली होती. या निर्णयाविरोधात कंगनाने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश