रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला बॉलिवूड जगतातील बरेच कलाकार उपस्थित होते. शाहरुख खान तर मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा चांगला मित्र आहे. त्यामुळे अंबानींच्या प्रत्येक समारंभात किंग खानची आवर्जून उपस्थिती असते. या कार्यक्रमाचे तो सूत्रसंचालन करत होता. यावेळी मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीला एक प्रश्न विचारताना मात्र शाहरुखला वेगळाच अनुभव आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमात अनंत अंबानीविषयी काही गोष्टी, काही किस्से शाहरुखने मजेशीरपणे उपस्थितींना सांगितले. अनंतच्या बालपणीचा किस्सा, त्यानंतर जिद्द आणि चिकाटीने त्याने कमी केलेले वजन या सर्वांबद्दल किंग खान गमतीशीरपणे सांगत होता. दोघांमध्ये हा संवाद सुरु असतानाच शाहरुखने अनंतला त्याच्या पहिल्या पगाराविषयी विचारले. ‘माझा पहिला पगार ५० रुपये इतका होता. तुझा पहिला पगार किती होता,’ असा प्रश्न त्याने विचारला. सुरुवातीपासूनच अनंत शाहरुखच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हजरजबाबीने देत होता. ‘मी जर तुम्हाला माझ्या पहिल्या पगाराविषयी सांगितले तर तुम्हाला लाज वाटेल,’ असे उत्तर अनंतने दिले. त्याच्या या उत्तराने उपस्थितांमध्येही हंशा पिकला.

पाहा हा व्हिडिओ..

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan asked anant ambani his first salary and anant answer left shah rukh embarrassed
First published on: 27-12-2017 at 13:18 IST