कोर्डेलिया क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कार्यक्रम आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चौघांसह आठ जणांना अटक केल्यानंतर आज आणखीन एका व्यक्तीला ड्रग्ससहीत पवईमध्ये अटक करण्यात आलीय. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १७ वर पोहोचली आहे. यात कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चार व्यक्तींसह तीन विक्रेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणाची सोशल नेटवर्किंगवरही तुफान चर्चा असून आर्यनच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्टार किड्स ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत. मात्र असं असतानाच आता आर्यनची बहीण आणि शाहरुखची मुलगी सुहानाने भावाच्या अटकेनंतर एक महत्वाचा निर्णय घेतलाय.

सुहाना खान सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे. तशी सुहाना सोशल मीडियावर फार आधीपासून आहे तरी तिने काही महिन्यांपूर्वीच या खात्याला सार्वजनिक केलं आहे. ती तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवरुन शेअर करत असते.

Why was Harvey Weinstein conviction overturned in the MeToo case
#MeToo प्रकरणातील अत्याचारी हार्वे वाइनस्टीन यांची शिक्षा रद्द का झाली? चळवळीला धक्का बसणार?
Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान

सुहानाच्या फोटोंना लाखोंच्या संख्येने लाईक्स येतात. मात्र आता तिला भाऊ आर्यनच्या अटकेनंतर अनेकजण सोशल मीडियावर सुहानालाही ट्रोल करू पाहत आहेत.

यामुळे सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सेटींगमध्ये बदल केले आहेत. तिने तिच्या पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद केलं आहे.

कोणीही आपल्या पोस्टवर ट्रोलिंग करुन त्रास देऊ नये, नकारात्मक प्रतिक्रिया देऊन टार्गेट करु नये या हेतूने तिने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सुहाना परदेशात शिक्षण घेत आहे.

शाहरुख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. यापैकी आर्यन वयाने सर्वात मोठा असून अबराम आठ वर्षांचा आहे.