ब्रिटेनमध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटांच्या तुलनेने शाहरुखचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट ब्रिटेनमध्ये १२५ सिनेमागृहांमध्ये दाखविण्यात येणार असून याचे १७० स्क्रिन्स प्रदर्शित होणार आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धिदरम्यान शाहरुख म्हणाला की, हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत असल्याने मी खूप खुश आहे. ब्रिटेनचे प्रेक्षक चांगले आहेत. अभिनेत्यांची प्रसिद्धी प्रादेशिक भागापूर्ती सिमीत असते, यावर माझा विश्वास नाही. पण, येथील प्रेक्षकांमध्ये माझी स्टार व्हॅल्यू थोडी कमी झाल्याचेही मी मान्य करतो.
दीपिका पादुकोण आणि शाहरुख यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ उद्या (शुक्रवारी) जगभरात प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Aug 2013 रोजी प्रकाशित
‘चेन्नई एक्स्प्रेस’ ब्रिटेनमध्ये मोठ्या प्रमाणात होणार प्रदर्शित
ब्रिटेनमध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय चित्रपटांच्या तुलनेने शाहरुखचा 'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
First published on: 01-08-2013 at 12:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khans chennai express to get biggest bollywood release in uk