‘शाळा’ चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला बरंच काही देणारा ठरला.. आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटाचा नवा अध्याय लिहिताना या चित्रपटाने सुजय डहाकेंच्या रूपात दूरदृष्टी असलेला एक हुशार दिग्दर्शक सिनेसृष्टीला दिलाच, पण त्यासोबत केतकी माटेगावकरसारखी सुंदर आणि चाणाक्ष अभिनेत्री तर अंशुमन जोशीसारखा अभिनेताही दिला. ‘शाळा’ या चित्रपटातील मुकुंद जोशी आपल्या सगळ्यांच्या चांगलाच लक्षात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शाळा’मध्ये त्याने साकारलेलं अल्लड वयातलं प्रेम आजही त्याच्या अभिनय क्षमतेची आठवण करून देतो. अंशुमन जोशी या मूळच्या सोलापूरकर मुलाने शाळेतलं अवघं विश्वच आपल्यासमोर उभं केलं. ‘शाळा’नंतर अंशुमन ‘फोटोकॉपी’ या चित्रपटात झळकला. सोशल मीडियावरील त्याचे फोटो पाहून आता त्यालं ओळखणंही कठीण होईल. ‘शाळा’नंतर अंशुमन ‘फोटोकॉपी’मध्ये एका वेगळ्याच अंदाजात दिसला. या चित्रपटातील त्याचा नवा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.

आणखी वाचा : इतिहासातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राइकचा तिकीटबारीवर ‘फत्तेशिकस्त’

मिलिंद बोकिल यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. सुजय डहाके दिग्दर्शित ‘शाळा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. दमदार अभिनयासाठी अंशुमनलाही पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अंशुमनने मराठी नाटकातही काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shala movie fame actor anshuman joshi now and then photos ssv
First published on: 18-11-2019 at 17:30 IST