मराठीतील पहिला सुपरहिरो चित्रपट असलेला ‘बाजी’ चित्रपट ६ फेब्रुवारी २०१५ला प्रदर्शित होणार आहे. ‘पुणे ५२’ ने दिग्दर्शनात पदार्पण करणा-या निखिल महाजन दिग्दर्शित या चित्रपटात श्रेयस तळपदे सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. यात अमृता खानविलकरही मुख्य भूमिकेत दिसणार असून जितेंद्र जोशी खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. ‘बाजी’चा पहिला टीझर हा श्रेयस तळपदेची निर्मिती असलेल्या ‘पोश्टर बॉइज’ चित्रपटासोबत प्रदर्शित करण्यात येणार आहे. दार मोशन पिक्चर्स, सुहृद गोडबोले यांचे इंडियन मॅजिक आय आणि निखिल महाजन यांची ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स अशा तीन चित्रपट संस्थांच्या वतीने ‘बाजी’ चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
श्रेयस तळपदेची निर्मिती असलेला ‘पोश्टर बॉइज’ १ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.