दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला. याच टीझरमुळे ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाची सध्या चर्चा रंगली आहे. या चित्रपटाविषयी अनेक दावे केले जात आहेत. या चित्रपटातील एका सीनसाठी कोट्यावधी रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने पहिला गुढीपाडवा ‘या’ ठिकाणी केला साजरा, फोटो शेअर करत गायिका म्हणाली…

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ६ मिनिटांच्या सीनसाठी भलीमोठी रक्कम खर्च केली आहे. चित्रपटात ‘गंगम्मा जत्रा’ व एक फाइट सीन दाखवण्यात आला आहे; जो ६ मिनिटांचा सीन आहे. याच सीनसाठी ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. हा सीन शूट करण्यासाठी तब्बल ३० दिवस लागले होते.

१५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. ५०० कोटी रुपये या चित्रपटावर एकूण खर्च झाल्याचं म्हटलं जात आहे. माहितीनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स अ‍ॅमेझॉन प्राइमने ३० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आता अल्लू अर्जुनच्या या बहुचर्चित चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स नेटफ्लिक्सने देखील खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमने दिलेल्या रक्कमेपेक्षा तीन पट रक्कम नेटफ्लिक्सने या चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंग राइट्ससाठी दिली आहे.

हेही वाचा –Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची हिंदी कॉमेडी शोमध्ये वर्णी, हेमांगी कवी व कुशल बद्रिकेबरोबर झळकला

‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार यांनीच सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागातील अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या ‘ऊ अंटवा’ या आएटम साँगने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. पण आता ‘पुष्पा २’ मध्ये ती आएटम साँग करणार की नाही ही येत्या काळातच समजले.

Story img Loader