बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. ईडी आणि सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत चाहत्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांमागे भक्कमपणे उभं राहावं, अशी विनंती सुशांतची बहिणी श्वेता सिंह किर्ती हिने केली आहे. तसेच सुशांतला न्याय मिळणारच असा विश्वास देखील तिने व्यक्त केला आहे.

‘ब्लॅक पँथर’च्या शेवटच्या ट्विटनं रचला विक्रम; ट्विटरनं देखील केला ‘किंग ऑफ वकांडा’ला सलाम

या टीव्ही अभिनेत्रीने नाकारली ‘बिग बॉस’ची कोट्यवधींची ऑफर; कारण…

“प्रार्थना करणं ही एकच गोष्ट मला माहित आहे. माझा देव हिच माझी खरी ताकत आहे. अशी शक्ती जी संपूर्ण सृष्टीला नियंत्रणात ठेवते. त्या शक्तीवर मला पूर्ण विश्वास आहे. सुशांतला न्याय मिळणारच कारण देवावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही असाच पाठिंबा द्या लवकरच सत्य समोर येईल.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करुन किर्तीने सुशांतच्या कुटुंबीयांमागे भक्कमपणे उभं राहावं अशी विनंती चाहत्यांना केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सुशांत प्रकरणात आलं वेगळं वळण

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला. रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार असल्याचे अ‍ॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.

रियाच्या फोनमधून मिळवलेल्या चॅट्समध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करत असल्याची समोर आली. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलिट केले होते. यातील पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज ८ मार्च २०१७ चे आहेत. या चॅट्सविषयी खुलासा होताच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने रियाविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.