‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली आहे. गेल्या चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेत अनेक ट्विस्ट आले. पण या ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं. मालिकेतील कलाकारांनी देखील आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक घर निर्माण केलं. अरुंधती असो किंवा संजना प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस केलं. आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील एका अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी लागल्याचं समोर आलं आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत काही महिन्यांपूर्वी माया या पात्राची एन्ट्री झाली होती. अभिनेत्री अक्षया गुरव हिने माया हे पात्र उत्तमरित्या साकारलं. त्यानंतर कथेनुसार या पात्राची मालिकेतून एक्झिट झाली. आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील एक्झिटनंतर अक्षयाची लोकप्रिय हिंदी मालिकेत एन्ट्री होणार असल्याचं वृत्त ‘पिंकविला’ वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

हेही वाचा – Video: मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकर ट्रोल; अभिनेत्याची पत्नी भडकली, नावाच्या अर्थासह सांगितली जात, म्हणाली…

‘पिंकविला’च्या वृत्तानुसार, ‘कुंडली भाग्य’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत अक्षया गुरव सना सय्यदची जागा घेणार आहे. म्हणजेच सना सय्यदने साकारलेल्या ‘पलकी’ या प्रमुख भूमिकेत अक्षया दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. सना सय्यद गरोदर असल्यामुळे तिची या मालिकेतून एक्झिट होणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा – ‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव

अक्षयाशी संपर्क साधला असता ती म्हणाला, “मला सर्व काही उघड करण्याची परवानगी नाहीये. प्रॉडक्शन हाऊसने होकार दिल्यानंतर मी तुमच्याशी याविषयी बोलू शकते.” आता अक्षया ‘कुंडली भाग्य’ मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार की नाही? हे येत्या काळातचं स्पष्ट होईल.