नवीन वर्षांत अनेक कलाकारांनी नवीन घरं, गाड्या घेत आपली स्वप्नपूर्ती केली. यामध्ये आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. मालिकांमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असतात. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेत्री अश्विनी महांगडे प्रसिद्धीझोतात आली.

अश्विनीने जानेवारी महिन्यात नव्या घराच्या किल्लीचा खास फोटो शेअर करत घर घेतल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. प्रत्येकाला वाटतं आपलं मुंबईत हक्काचं घर असावं. त्यामुळे मुंबईत स्वत:चं घर घेतल्यावर अभिनेत्रीची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली आहे. अश्विनीने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला. याचा खास व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : “आमचं ठरलं होतं आधीचं…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! बायकोसाठी घेतला हटके उखाणा

गृहप्रवेश पूजेला अश्विनीच्या घरातील सगळे कुटुंबीय व तिचा होणार नवरा उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्रीने या व्हिडीओला “आमच्या सगळ्यांचं घर…माझ्या माणसांमुळे या घराला घरपण आहे” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : Video : सातासमुद्रापार ‘नाच गं घुमा’! मुक्ता बर्वेचा परदेशात जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

हेही वाचा : ठरलं तर मग : सुभेदारांच्या घरी आली साक्षी! चैतन्य अन् अर्जुनमध्ये होणार जोरदार भांडण, मालिकेत पुढे काय घडणार?

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर नव्या घरासाठी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अश्विनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. अभिनयाव्यतिरिक्त अनेक सामाजिक कार्यांमध्ये ती सक्रिय असते. याशिवाय लवकरच ती मोठ्या पडद्यावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे.