Premium

ऋता दुर्गुळेच्या हातावरील ‘hdp’ टॅटूचा अर्थ काय? अभिनेत्रीनेच सांगितलं होतं गुपित, जाणून घ्या

तिने तिच्या हाताच्या मनगटावर hdp ही अक्षरं असलेला टॅटू काढला आहे.

Hruta tattoo

अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. आज तिचा वाढदिवस आहे. तिच्या कामाचं प्रेक्षक कौतुक करत असतातच, याचबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती चांगलीच चर्चेत असते. यापैकीच एक गोष्ट जी सर्वांचं लक्ष वेधून घेत असते ती म्हणजे ऋताचा टॅटू. या टॅटूचा अर्थ काय? हे आपण जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋता नेहमीच तिच्या आयुष्याबद्दल दिलखुलासपणे भाष्य करत असते. तर आतापर्यंत अनेकदा ती तिच्या टॅटूबद्दलही बोलली आहे. तिने तिच्या हाताच्या मनगटावर hdp ही अक्षरं असलेला टॅटू काढला आहे. या टॅटूचा अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

आणखी वाचा : “कुठे मिळते अशी सासू…,” ऋता दुर्गुळेने उलगडलं सासूबाईंबरोबर असलेलं नातं, म्हणाली, “त्या खूप…”

तर ऋताच्या हातावर असलेला हा hdp लिहिलेला टॅटू म्हणजे ती आणि तिच्या दोन मैत्रिणींनामधील असलेल्या मैत्रीचं प्रतीक आहे. ऋताने आणि ध्रुवी आणि पूर्वा या तिच्या दोन खास मैत्रिणींनी त्या तिघींच्याही हातावर एकाच फॉन्टमध्ये त्या तिघींच्या नावातील पहिली अक्षर कोरली आहेत. त्या तिघी किती घट्ट मैत्रिणी आहेत हे या टॅटूमधूनच स्पष्ट होतं.

हेही वाचा : “… म्हणून ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक सोडलं,” ऋता दुर्गुळेने स्पष्ट केलं कारण

दरम्यान, ऋता आत्तापर्यंत अनेक चित्रपट, नाटकं, मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे. तर आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते आणि मनोरंजनसृष्टीतील तिची मित्रमंडळी सोशल मीडियावरून तिला शुभेच्छा देत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress hruta durgule had revealed the meaning of her tattoo know about it on her birthday rnv

First published on: 12-09-2023 at 10:11 IST
Next Story
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या नातवाचे झालं बारसं, नावाचा अर्थ माहितीये का?