‘फुलपाखरू’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी ऋता दुर्गुळे आज मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचं नाव मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकामुळे प्रेक्षकांना तिच्याशी थेट संवाद साधता आला. मात्र या नाटकातून तिने अचानक एग्झिट घेतली. आता याचं कारण तिने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋता दुर्गुळे आणि उमेश कामात यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. यातील ऋता आणि उमेशची बहिण-भावांची केमिस्ट्री सुपरहिट झाली. या नाटकाचे सर्वच प्रयोग हाउसफुल होत होते. पण अशातच ऋताने हे नाटक सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तिने हा निर्णय का घेतला याचं कारण तिने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : “ज्यांना वाद निर्माण करायची इच्छा असेल त्यांनी…,” नथुराम गोडसेच्या भूमिकेबाबत चिन्मय मांडलेकरचं रोखठोक मत

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या एका कार्यक्रमात ती म्हणाली, “‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक जेव्हा मी करत होते तेव्हा माझी एकाच वेळी खूप काम सुरू होती. मी पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते म्हणून या टीमवर मला अन्याय करायचा नव्हता. या नाटकातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण जर आता अशी चांगली भट्टी जमून येणार असेल तर मला पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करायला नक्कीच आवडेल.”

हेही वाचा : “आजपासून ९ वर्षांपूर्वी मी…”, व्हिडीओ शेअर करत हृता दुर्गुळे झाली भावूक

ऋताने जेव्हा ‘दादा गुड न्यूज आहे’ हे नाटक सोडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. मात्र तिने दिलेला स्पष्टीकरणामुळे त्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर झाले. त्यामुळे आता ती पुन्हा कधी नाटकांमध्ये दिसणार त्याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hruta durgule shared why did she take exit from dada ek good news aahe rnv
First published on: 14-01-2023 at 11:16 IST