Premium

“आजवर छेड काढणाऱ्या ४ पोरांना धुतलंय…,” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “शाळेत असताना…”

तिने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या शालेय जीवनातील काही आठवणी शेअर केले आहेत.

surbhi

मराठी मनोरंजन सृष्टीतील बेधडक आणि स्पष्टवक्त्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. सुरभीने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. तर ‘स्वामिनी’ या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या कामाबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असतेच पण याबरोबरच समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि तिला खटकणाऱ्या गोष्टींबद्दलही परखडपणे भाष्य करताना दिसते. तर तिची छेड काढणाऱ्या चार जणांना तिने आतापर्यंत चोप दिला असल्याचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरभी सोशल मीडिया बरोबरच यू ट्यूबवरही सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्यावरती विविध व्हिडिओ शेअर करत आतापर्यंत तिला आलेले अनुभव मोकळेपणाने चाहत्यांना सांगत असते. तर तिने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करून तिच्या शालेय जीवनातील काही आठवणी शेअर केले आहेत.

आणखी वाचा : “गणपती बाप्पासमोर ‘आला बाबुराव’ हे गाणं ऐकलं आणि…,” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

ती म्हणाली, “मी मुळची कोकणातली आहे. गुहागरची. पहिली ते चौथी माझं शिक्षण गुहागरमध्ये झालं. पण माझ्या आयुष्याला राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेमुळे कलाटणी मिळाली. ही आशिया खंडातील मुलींसाठीची पहिली सैनिकी शाळा आहे. या शाळेच्या पहिल्या बॅचची मी पास आऊट आहे.”

हेही वाचा : ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये स्पृहा जोशीच्या ऐवजी दिसणार रसिका सुनील, प्रतिक्रिया देत निर्माता अवधूत गुप्ते म्हणाला, “मी तिला…”

याबद्दल अधिक माहिती देताना ती म्हणाली, “त्या शाळेत हॉस्टेलमध्ये राहणं अनिवार्य होतं. तिथे अभ्यासाबरोबरच स्विमिंग, योगा, रायफल शूटिंग, कराटे अशा गोष्टींचंही प्रशिक्षण मिळतं. तर त्याशिवाय तिथे सैनिकी प्रशिक्षणही दिलं जातं. त्यामुळे आजवर माझी छेड काढणाऱ्या चार मुलांना मी हाणलं आहे. याचं सगळं श्रेय या शाळेतील ट्रेनिंगला जातं.” तर आता तिचं हे बोलणं चर्चेत आलं असून तिच्या हिंमतीचं सर्वजण कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress surabhi bhave reveales she had fight with four men who tried to harrass her rnv

First published on: 06-10-2023 at 14:37 IST
Next Story
‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीच्या आईला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो