ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी मराठी कलाविश्वात कायम चर्चेत असते. दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचे व्हिडीओ, फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. इन्स्टाग्राम रिल्सवर नारकर जोडप्याच्या रील्सची सर्वत्र विशेष चर्चा रंगलेली असते. वयाच्या पन्नाशीनंतरही या दोघांचा कमालीचा फिटनेस, डान्स करण्याची उर्जा या गोष्टींचं सर्वत्र कौतुक केलं जातं.

ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी आजवर अनेक चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता अभिनयाव्यतिरिक्त दोघेही विविध गाण्यांवर इन्स्टाग्राम रील्स बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. नुकताच त्यांनी लोकप्रिय मल्याळम भक्तिगीतावर सुंदर असा डान्स केल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नारकर जोडप्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : “वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा…”, वडील विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशने वाहिली आदरांजली

दुर्गा विश्वनाथ यांनी मल्याळम भाषेत गायलेलं ‘ठकरुथलम नल्ला ठकरुथलम’ हे भक्तिगीत सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंड होत आहे. “ठकरुथलम नल्ला” या गाण्याला प्रदीप इरिंजलकुडा यांनी संगीत दिलं आहे. तसंच हे गीत सुद्धा त्यांनीच लिहिलेलं आहे.

हेही वाचा : Cannes मध्ये ३० वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्काराने सन्मान! मराठमोळ्या छाया कदम यांचं सर्वत्र होतंय कौतुक

नारकर जोडप्याने या व्हिडीओमध्ये अतिशय भक्तिभावाने सुंदर असा डान्स केल्याने सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “तुमचे रील्स बघितल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही”, “चिरतरुण जोडी…” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. अभिनेत्रीने या व्हिडीओला “काही नाही…फक्त आनंदी राहा” असं कॅप्शन दिलं आहे. तर, केवळ दोन दिवसांत या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा : Video: “एव्हरग्रीन लव्हबर्ड्स”, ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकरांचा रोमँटिक डान्सवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : “नाटक, अभिनय तुझ्यासाठी नाही…”, पुरस्कार जिंकल्यावर अक्षया नाईकची भावुक पोस्ट; म्हणाली, “गेले ४८ तास…”

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. तर, अविनाश नारकरांच्या ‘कन्यादान’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये त्यांच्याशिवाय अनिषा सबनीस, संग्राम साळवी, अमृता बने, स्मितल हळदणकर, चेतन गुरव, शुभंकर एकबोटे असे अनेक कलाकार होते.