मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर. दोघं व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. जसा ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या अभिनयाचा चाहता वर्ग आहे. तसाच आता त्यांच्या डान्स व्हिडीओचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नेहमी चाहत्यांच्या मनोरंजनासाठी विविध डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. अनेकदा दोघांना ट्रोल केलं जात, पण ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर सडेतोड उत्तर देतात. काही दिवसांपूर्वी तर एका ट्रोलरने दोघांची माफी मागितली होती. अशातच नुकताच ऐश्वर्या यांनी आणखी एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता झाला फिट, शेअर केला फोटो अन् सांगितला डाएटमंत्र

या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकर अविनाश यांच्याबरोबर ‘नायक’ चित्रपटातील ‘रुखी सूखी रोटी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. नेहमीप्रमाणे दोघांचा एनर्जेटिक डान्स पाहायला मिळत आहे. पण यावेळेस सगळ्यांचं लक्ष डान्सने नाही तर अविनाश नारकरांच्या नव्या लूकने वेधलं आहे.

ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अविनाश नारकरांचा नवा लूक पाहायला मिळत आहे. त्यांचे पूर्वी पांढरे केस होते. जे त्यांनी आता काळे केले आहेत. हाच अविनाश नारकरांचा नवा लूक नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तुमच्या दोघांना पाहून असं वाटतं की, असं जगता आलं पाहिजे…तुम्ही दोघे क मा ल आहात…अविनाश दादा खूप छान दिसत आहात…चिरतरुण…तुमच्या दोघांना खूप प्रेम.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ऐश्वर्या तुमची साडी पण छान आहे. सरांनी केस काळे केलेत, छान दिसतात.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “नारकरांनी हेअर कलर केलाय. खूपच भारी दिसतायत.”

हेही वाचा – “शिंदे सरकारच मल्टीप्लेक्सवाल्यांचा माज उतरवेल”, मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो न मिळण्याबाबत प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला…

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तसंच ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकरांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.