९० च्या दशकात ‘महाभारत’ मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले नितीश भारद्वाज सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी त्यांच्या आयएएस अधिकारी पत्नी स्मिता घाटे यांच्यावर मानसिक त्रासाचे आणि मुलींना भेटू देत नसल्याचे आरोप केले होते. इतकंच नाही तर नंबर ब्लॉक केला असून ईमेलवर उत्तर देत नसल्याचं ते म्हणाले होते. या आरोपांवर आयएएस अधिकारी स्मिता घाटे यांनी आता अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून प्रतिक्रिया दिली आहे. सर्व आरोप खोटे असल्याचं स्मिता यांनी म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मिता म्हणाल्या, “मी नितीश भारद्वाज यांची पत्नी स्मिता भारद्वाज आहे. आता मला माझ्या अल्पवयीन जुळ्या मुली देवयानी आणि शिवरंजनी यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रेस आणि सामान्य जनतेसमोर माझी बाजू मांडणं आवश्यक वाटतंय. माझे पती श्री नितीश भारद्वाज हे माझ्याबद्दल पत्रकारांना तसेच इतर विविध माध्यमांद्वारे काही खोटी आणि बनावट विधानं, आरोप व निवेदनं सातत्याने देत आहेत. त्यामुळे मी माझी बाजू मांडणं गरजेचं झालंय. ते माझी प्रतिमा खराब करण्यासाठी खोटे आरोप करत आहेत.”

‘महाभारत’ मधील ‘कृष्णा’चे IAS अधिकारी असलेल्या एक्स पत्नीवर गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार देत म्हणाले…

त्या पुढे म्हणाल्या, “मुलींशी संपर्कात नसल्याचा नितीश यांनी केलेला दावा दिशाभूल करणारा आहे. कारण, यापूर्वी त्यांनी माझ्याशी व मुलींशी लँडलाईन नंबरवर संवाद साधला आहे. याबद्दल त्यांनी कौटुंबिक न्यायालयासमोर देखील कबुली दिली आहे. तसेच न्यायालयीन कामकाज आणि मुलांशी संबंधित प्रकरणांशी संवाद साधण्यासाठी एक ई-मेल आम्ही वापरत आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून ते त्या ई-मेल आयडीद्वारे आमच्याशी संपर्कात आहेत. असे असूनही त्यांनी ८ व ९ फेब्रुवारी २०२४ रोजी जाणीपूर्वक त्या संबंधित ई-मेलवरून संवाद साधणं बंद केलं. या सगळ्यापासून त्यांनी मला अनभिज्ञ ठेवलं. तसंच ते माझ्याशी एसएमएसद्वारे संवाद साधू शकतात. मी त्यांना ब्लॉक केलेलं नाही. याचा पुरावा माझ्या फोनवरून १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजून २१ मिनिटांनी त्यांना पाठवलेल्या मेसेजमधून मिळतो. तो मेसेज मी त्यांना पाठवला होता.” यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिलंय.

सिंहांच्या ‘अकबर’ व ‘सीता’ नावावरून वाद, स्वरा भास्कर लव्ह जिहादचा उल्लेख करत म्हणाली, “भारतात अशा मूर्खपणाला…”

त्या म्हणाल्या, “हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर नितीश भारद्वाज यांनी मुलींबद्दल खरोखरच चिंता व्यक्त केली असेल, तर त्यांच्याकडे माझ्या कायदेशीर प्रतिनिधीशी आणि इतर जवळच्या लोकांशी संपर्क साधण्याचा पर्याय होता. तसेच ते कुटुंबातील कुणाशीही संपर्क साधू शकले असते, पण त्यांनी असे कोणतेही प्रयत्न केलेले नाही. यावरून भारद्वाज यांचे गुप्त हेतू दिसून येतात. ते माध्यमांसमोर माझ्यावर छळ, मानसिक त्रास असे आरोप माझी प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने करत असल्याचं दिसतंय.”

स्मिता घाटे भारद्वाज यांचे निवेदन

“या संपूर्ण प्रकरणानंतर मुलींना धक्का बसला आहे आणि त्या रडत आहेत. मुलींनी श्री भारद्वाज यांना स्पष्टपणे सांगितले आहे की भविष्यात त्यांनी त्यांच्या (मुली) बद्दल पत्रकार/माध्यमांना कोणतीही माहिती देऊ नये, कारण यामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसलाय आणि त्रास होत आहे. पालकांमधील वादविवाद सार्वजनिकरित्या पाहणं कोणत्याही मुलांना आवडत नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ias smita gate reacts on allegations made by husband actor nitish bharadwaj hrc
First published on: 19-02-2024 at 13:23 IST