Premium

‘कन्यादान’ मालिकेतील ‘हे’ ऑनस्क्रिन नवरा-बायको खऱ्या आयुष्यातही बांधणार लग्नगाठ; साखरपुड्याचे फोटो व्हायरल

मालिकेतील लोकप्रिय जोडीचा नुकताच साखरपुडा सोहळा पार पडल.

kanyadan fame actor and actress got engaged
'कन्यादान' मालिकेतील लोकप्रिय जोडीने उरकला साखरपुडा

मराठी मनोरंजसृष्टीत एकामागोमाग एक अनेक जोड्या लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अभिनेत्री अमृता देशमुख व प्रसाद जवादे यांनी लग्नगाठ बांधली. आता लवकरच स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी विवाहबंधनात अडकणार आहेत. आता नुकतचं लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप साखरपुडा करत लग्न ठरल्याची बातमी शेअर केली. या सगळ्यांबरोबर आता आणखी एक लोकप्रिय जोडी लग्नाच्या बेडीत अडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘झी मराठी’वर ४ डिसेंबरपासून होणार मोठा बदल! दोन लोकप्रिय मालिकांचं दुपारी होणार प्रक्षेपण, तर चला हवा येऊ द्या…

‘सन मराठी’ वाहिनीवर लोकप्रिय मालिका ‘कन्यादान’ मालिकेतील वृंदा-राणा म्हणजेच अमृता बने आणि शुभंकर एकबोटे खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेता संग्राम साळवीने आपल्या इन्स्टाग्रामवर या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. साखरपुड्याला अमृता आणि शुभंकरने पारंपारिक कपडे परिधान केले होते. अमृताने हिरव्या रंगाची साडी तर शुभंकरने फिक्कट हिरव्या रंगाचा कुर्ता घातला होता.

‘कन्यादान’ मालिकेत अमृता बनेने वृंदा आणि शुभंकर एकबोटेने राणा हे पात्र साकारले आहे. या मालिकेच्या सेटवरच अमृता आणि शुभंकर यांची पहिल्यांदा भेट झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्न करणार आहेत.

हेह वाचा- आता महाराष्ट्र खळखळून हसणार! ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘कन्यादान’ मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कमी वेळातच ही मालिका लोकप्रिय बनली. या मालिकेत या मालिकेत अभिनेते अविनाश नारकर मुख्य भूमिकेत असून उमा सरदेशमुख, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, अमृता बने, प्रज्ञा चवंडे, शुभंकर एकबोटे यांची प्रमुख भूमिका आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kanyadan fame actress amruta bane and actor shubhankar ekbote engaged photo viral on instagram dpj

First published on: 28-11-2023 at 17:40 IST
Next Story
‘झी मराठी’वर ४ डिसेंबरपासून होणार मोठा बदल! दोन लोकप्रिय मालिकांचं दुपारी होणार प्रक्षेपण, तर चला हवा येऊ द्या…