Premium

KBC Junior: १२ वर्षांच्या मुलाने जिंकले एक कोटी रुपये, पण सात कोटींच्या ‘या’ प्रश्नावर सोडला खेळ; तुम्हाला माहितीये का उत्तर?

१२ वर्षांच्या मुलाने रचला इतिहास, १ कोटी जिंकणारा सर्वात कमी वयाचा स्पर्धक ठरला

kon banega crorepati junior 12 years old mayank won 1 crore
मयंकने जिंकले एक कोटी रुपये (फोटो – सोनी टीव्ही ऑफिशिअल इन्स्टाग्राम)

‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. या शोचे होस्ट महानायक अमिताभ बच्चन आहेत. सध्या ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर’ चालू आहे. हा शो दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. या शोमध्ये एकापेक्षा एक हुशार स्पर्धक पाहायला मिळत आहेत. बिग बी या स्पर्धकांबरोबर धमाल करताना दिसतात. अशातच एका अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने १ कोटी रुपये जिंकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आठवड्यात सोमवार व मंगळवारच्या भागात हरियाणा येथील महेंद्रगढमधील १२ वर्षांचा मयंक हॉट सीटवर पोहोचला. शोमध्ये बिग बींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं देत मयंकने १ कोटी रुपये जिंकले. मयंक हा या शोमध्ये १ कोटी रुपये जिंकणारा सर्वात कमी वयाचा स्पर्धक बनला आहे. पण तो ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकला नाही. त्याला १ व ७ कोटी रुपयांसाठी कोणते प्रश्न विचारण्यात आले होते, ते जाणून घेऊयात.

अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांच्या उंचीची १२ वर्षांच्या मुलाशी केली तुलना; म्हणाले, “माझ्याबरोबर…”

मयंकला १ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न –

नव्याने सापडलेल्या खंडाला ‘अमेरिका’ हे नाव असलेला नकाशा तयार करण्याचे श्रेय कोणत्या युरोपियन कार्टोग्राफरला दिले जाते?

यासाठी त्याला ए) अब्राहम आर्टिलियस, बी) जेरार्डस मर्केटर, सी) जिओव्हानी बॅटिस्टा अॅग्रेसी, डी) मार्टिन वाल्डसीमुलर हे पर्याय देण्यात आले होते.

या प्रश्नावर मयंक थोडा गोंधळलेला दिसतो. त्याला उत्तराची खात्री नसते आणि मग तो त्याची उरलेली लाईफलाईन वापरतो. यानंतर, मयंक एक कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देताना डी पर्याय निवडतो. त्याने निवडलेले मार्टिन वाल्डसीमुलर हे उत्तर अगदी बरोबर असते आणि तो एक कोटी रुपये जिंकतो. बिग बी त्याला मिठी मारून एक कोटी रुपये जिंकल्याबद्दल शुभेच्छा देतात.

७ कोटींचा प्रश्न कोणता?

सुभेदार एन.आर. निक्कम आणि हवालदार गजेंद्र सिंग यांना दुसऱ्या महायुद्धात कोणत्या शहरात साहित्य पोहोचवल्याबद्दल रशियाने ऑर्डर ऑफ द रेड स्टारने सन्मानित केले होते? हा प्रश्न होता. त्यासाठी
ए) तबरीझ, बी) सिडोन, सी) बटुमी, डी) अल्माटी हे पर्याय देण्यात आले होते.

या प्रश्नाचं उत्तर मयंकला माहीत नव्हतं, त्यामुळे त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kon banega crorepati junior 12 years old mayank won 1 crore quit show on this 7 crore question hrc

First published on: 29-11-2023 at 10:18 IST
Next Story
‘कन्यादान’ मालिकेतील ‘हे’ ऑनस्क्रिन नवरा-बायको खऱ्या आयुष्यातही बांधणार लग्नगाठ; साखरपुड्याचे फोटो व्हायरल