माधुरी दीक्षितने नुकताच तिचा ५७ वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री सध्या ‘डान्स दीवाने’ शोमुळे चांगलीच चर्चेत आहे. या शोमध्ये धकधक गर्लचा वाढदिवस अत्यंत सुंदररित्या साजरा करण्यात आला होता. माधुरीसाठी कार्यक्रमात खास विशेष भागाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शोमध्ये तिचे पती डॉ. श्रीराम नेने देखील उपस्थित राहिले होते. याशिवाय छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिता लोखंडेने सुद्धा माधुरीसाठी खास डान्स परफॉर्मन्स सादर केला. हे सगळे सरप्राइजेस पाहून अभिनेत्री चांगलीच भारावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डान्स दिवाने’ कार्यक्रमातील या विशेष भागानंतर आता या शोच्या महाअंतिम सोहळ्याची जोरदार चर्चा चालू आहे. आता हा शो शेवटच्या टप्प्याकडे चालला आहे. २५ मे रोजी ‘डान्स दिवाने’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यावेळी या शोचे परीक्षक माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टी खास गाण्यांवर सादरीकरण करणार आहेत.

सुनील शेट्टीला बॉलीवूडचा अन्ना असं बोललं जातं. ‘डान्स दिवाने’च्या रंगमंचावर अन्नाने बॉलीवूडचा लोकप्रिय चित्रपट ‘बॉर्डर’मधील “संदेशे आते हैं…” या गाण्यावर खूपच सुंदर सादरीकरण केलं. त्याचा परफॉर्मन्स पाहून उपस्थित सगळ्या प्रेक्षकांचे डोळे पाणावले होते. याशिवाय माधुरी दीक्षितने खास ‘बाहुबली’ चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांवर जबरदस्त डान्स केल्याचं यावेळी पाहायला मिळालं आहे.

हेही वाचा : “माझी बहीण, सखी, मैत्रीण”, तेजस्विनी पंडितच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; म्हणाली, “तेजू आयुष्यभर…”

माधुरीने ‘बाहुबली’ चित्रपटातील “धीवरा…” गाण्यावर थिरकण्यासाठी खास परिकथेप्रमाणे पोशाख केला होता. हे गाणं मूळ तमन्ना भाटियावर चित्रीत करण्यात आलं आहे. तमन्नाने ‘बाहुबली’मध्ये साकारलेल्या भूमिकेचं नाव अवंतिका असं आहे. माधुरीचा हा हटके लूक पाहून बऱ्याच जणांनी चक्क तिची तुलना डिस्ने प्रिन्सेसबरोबर केली आहे. याशिवाय अभिनेत्रीचे चाहते तिच्या या मनमोहक अदा पाहून चांगलेत भारावून गेल्याचं कमेंट्स सेक्शनमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “…हा मनसेचा शब्द आहे”, दामोदर नाट्यगृहासाठी अमेय खोपकरांचा मुंबई पालिकेला इशारा; म्हणाले, “कुटील डाव कधीही…”

दरम्यान, माधुरी दीक्षितने आजवर ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘खलनायक’, ‘देवदास’, ‘हम दिले दे चुकें सनम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे. ९० चं दशक तिने मोठ्या प्रमाणात गाजवलं होतं. आजच्या काळात सुद्धा माधुरीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वीच तिची व डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit recreates avantika from bahubali at the age of 57 in dance deewane grand finale sva 00
Show comments