‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम घरोघरी लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेते समीर चौघुले यांना हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. अभिनयाबरोबच ते उत्तम लेखक म्हणून ओळखले सुद्धा आहेत. हास्यजत्रेतील अनेक गाजलेल्या स्किटचं लेखन समीर चौघुले यांनी केलं आहे. नुकत्याच राजश्री मराठी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हास्यजत्रेच्या प्रत्येक स्किटसाठी कितीजण मेहनत घेतात तसेच अलीकडच्या काळात लेखनावर येणाऱ्या मर्यादा याविषयी भाष्य केलं आहे.

हेही वाचा : “मेरे प्यारे शाहरुख!”, ‘जवान’ चित्रपटासाठी अनुपम खेर यांची खास पोस्ट; म्हणाले, “मुंबईला आल्यावर…”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

समीर चौघुले म्हणाले, “हास्यजत्रेतील प्रत्येक स्किटसाठी एक क्रिएटिव्ह टीम काम करत असते. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांनी पिढ्या घडवल्या आहेत. त्यांचं मार्गदर्शन लाभतंय हे आमचं भाग्यचं आहे. त्यामुळे विषयांची निवड करण्यासाठी आमची एक स्वतंत्र बैठक होते. सध्याच्या काळात लेखक म्हणून अनेक बंधनं आहेत. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, अलीकडे लोकांच्या भावना या काचेपेक्षा नाजूक झाल्या आहेत. त्यामुळे आमची लेखकांची मिटींग जवळपास १० तास वगैरे चालते.”

हेही वाचा :  ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला आवडतं ‘या’ पद्धतीचं जेवण; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली

अभिनेते पुढे म्हणाले, “हास्यजत्रेतील कोणत्या कलाकारासाठी कोणती भूमिका जास्त योग्य ठरेल? या सगळ्याचा विचार आम्हा लेखकांना करावा लागतो. प्रेक्षक जेव्हा मी लिहिलेलं एखादं स्किट पाहत असतात तेव्हा संपूर्ण श्रेय माझं एकट्याचं नसतं त्यात प्रत्येकजण काहीतरी इनपूट देत असतो. सगळ्या स्किट्सवर एकत्र मेहनत घेतली जाते. ‘अब तो हो गया…’ असं मी कधीच म्हणत नाही कारण, ही जबाबदारी खूप मोठी आहे.”

हेही वाचा : “सतत मृत्यूची भीती”, काश्मीरमध्ये गेलंय प्रसिद्ध अभिनेत्याचं बालपण; म्हणाला, “भर रस्त्यात गोळीबार…”

“लेखन ही सर्वात अवघड कला आहे, असं मी का म्हणतोय त्याचं एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी माझ्या एका स्किटमध्ये जे लेफ्टी असतात त्यांचं हस्ताक्षर एवढं काही खास नसतं. असं एक वाक्य होतं. त्या स्किटमुळे मला काही लेफ्टी लोकांचे धमक्यांचे फोन आले. अरे आमचं हस्ताक्षर चांगलं नाही का? असं कसं तुम्ही म्हणू शकता?…याचा अर्थ आपण आजकाल मनमोकळेपणाने कोणत्याच विषयावर बोलू शकत नाही. विनोदासाठी आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तसा प्रकार आता राहिलेला नाही.” असं समीर चौघुलेंनी सांगितलं.

Story img Loader