‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने मराठी मनोरंजनसृष्टीला अनेक गुणी कलाकार दिले. प्रत्येकाने प्रेक्षकांच्या मनात आपल्या विनोद शैलीमुळे वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकही या कलाकारांवर भरभरून प्रेम करताना पाहायला मिळतात. यामधील एक म्हणजे पृथ्वीक प्रताप. आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर पृथ्वीक आज लोकप्रिय झाला आहे. सध्या त्याचा एक फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. हा फोटो पाहून चाहते त्याला ‘हास्यजत्रेचा शाहरुख’ असं म्हणतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: वाढदिवसाच्या निमित्ताने KBC 15च्या मंचावर दिलं सरप्राइज, बिग बींना झाले अश्रू अनावर

अभिनेता पृथ्वीक प्रताप सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. नवनवीन व्हिडीओ, फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याने एक कूल लूकमधला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे, “अब ये एलान, मेरी जान, विधिवत कर दो, में तुम्हारा ही रहू, ऐसी वसीहत कर दो.”

हेही वाचा – Bigg Boss 17: बिग बॉसच्या आगामी पर्वात सिस्टम हँग करायला एल्विश यादव नाही, तर ‘ती’ येणार?

पृथ्वीकच्या याच फोटोवर त्याला ‘हास्यजत्रेचा शाहरुख’ खान अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, व्हाय प्लस सेक्युरिटीनंतर सेल्फी घेत असलेला शाहरुख. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, विक्रोळीचा शाहरुख.

हेही वाचा – Video: स्वरा मल्हारची मुलगी असल्याचं सत्य अखेर शुभंकरसमोर उघड करणार ‘ही’ व्यक्ती, ‘तुझेच मी गीत गात आहे’चा नवा प्रोमो आला समोर

दरम्यान, पृथ्वीकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात पृथ्वीकच्या साथीला अभिनेता प्रथमेश परब दिसणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap new photo goes viral pps
First published on: 11-10-2023 at 09:00 IST