मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून अभिजीत खांडकेकरला ओळखले जाते. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून तो घराघरांत पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिजीतने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. अशातच अभिजीतने त्याची पत्नी सुखदासाठी खास पोस्ट शेअर केली.

अभिजीतप्रमाणे सुखदाही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. सुखदा एक उत्तम अभिनेत्री आहे. सध्या ती हिंदी नाटक ‘अजातशत्रू’मध्ये काम करीत आहे. अभिजीतने नुकताच या नाटकाचा प्रयोग पाहिला. या नाटकातील त्याच्या पत्नीने केलेला अभिनय पाहून तो भारावून गेला. दरम्यान, पत्नीच्या कौतुकासाठी अभिजीतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिजीतने पोस्टमध्ये लिहिले, “काल इब्सेन फेस्टिवलमधील इला अरुण यांनी रूपांतरीत केलेलं आणि इला अरुण व के. के. रैना सरांनी दिग्दर्शित केलेलं ‘अजातशत्रू’ हे हिंदी नाटक पाहण्याचा योग आला. अत्यंत गंभीर विषयावरचं; पण तितकंच प्रभावीपणे सादर केलेलं नाटक सगळ्यांनी पाहावं असंच आहे.

Poetess Pradnya Daya Pawar reaction on Chinmay Mandlekar Getting Trolled For His Son Name Jehangir
“फक्त भूमिका चोख वठवून चालत नाही,” चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगबाबत प्रसिद्ध कवयित्रीची पोस्ट; म्हणाल्या, “काळ…”
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

अभिजीतने पुढे लिहिले, “या सगळ्यात उठून दिसणारी – सुखदा. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकाच नाटकात दोन पात्रांचा अभ्यास करणं आणि त्या दोन्हींपैकी कुठलं छान साकारलं म्हणून प्रेक्षकांना तितकंच बुचकळ्यात पाडावं हे तूच करू जाणे. प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेच्या तुझ्या मेहनतीचा मी सगळ्यात जवळचा साक्षीदार आहे. इतकी मेहनत, इतकं समर्पण, प्रत्येक गोष्ट परिपूर्ण व्हावी म्हणून असलेला पराकोटीचा अट्टहास व तळमळ बघून एखाद्या वर्गात सतत पहिल्या येणाऱ्या मुलीबद्दल जशी असूया वाटते ना तशी वाटते आणि त्याचबरोबर अभिमानही वाटतो. इतकं सगळं करून मंचावरचा तुझा वावर, तुझं सहज ते पात्र होऊन जाणं, हिंदीवरचं प्रभुत्व प्रेक्षकांना खिळवून ठेवत नसेल, तर नवलच. खूप प्रेम व प्रचंड आदर.”

हेही वाचा- रोहित मानेच्या पत्नीने शेअर केला नव्या घरातील पहिला फोटो; म्हणाली, “स्वत:च्या घरात…”

अभिजीतची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स व लाइक्सचा पाऊस पाडला आहे. एवढेच नाही, तर अभिनेत्याची पत्नी सुखदा खांडकेकरनेही या पोस्टवर कमेंट करीत, ”तू आहेस म्हणून मी आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे,” असे लिहिले आहे.

अभिजीतच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर मालिका, चित्रपट, तसेच वेब सीरिजच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आला आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील त्याची भूमिका खूप गाजली. सध्या तो स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.