भारतीय संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवणारा एक सण म्हणून रक्षाबंधनला ओळखले जाते. श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. आज सर्वत्र मोठ्या थाटात रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने सिनेसृष्टीतील अनेक कलाकार जुन्या आठवणी शेअर करताना दिसत आहेत.

आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच मानसी नाईकने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : “मी सई ताम्हणकरची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला, पण…” अमृता खानविलकर स्पष्टच बोलली

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Raghu Ram blames the MTV show for his divorce
“रोडीजमुळे माझा घटस्फोट झाला,” प्रसिद्ध अभिनेत्याचं विधान; म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

मानसीने नुकतंच तिच्या भावाबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात मानसीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर तिचा भाऊ पांढरा रंग टीशर्ट पँटमध्ये दिसत आहे. मानसीच्या सख्ख्या भावाचे नाव अमेय नाईक असे आहे.

आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

“बालपणीचे ते आमचे दिवस आहेत खूप खास. माझ्या Dadu chi आहे, मला प्रत्येक वेळेस साथ”, असे कॅप्शन मानसीने या पोस्टला दिले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.