‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग एका आठवड्यापासून बेपत्ता आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. या मालिकेत गुरुचरणच्या मुलाची ‘गोगी’ ची भूमिका साकारणाऱ्या समय शाहने ‘इंडियन एक्सप्रेस’ला अभिनेत्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. आपलं काही महिन्यांपूर्वी गुरुचरण सिंगशी बोलणं झालं आणि तासभर गप्पा मारल्या, तसेच अभिनेता आपल्या पंजाबी चित्रपटावर काम करत होता, असंही समयने सांगितलं.

समयने गुरुचरणशी त्याचं अखेरचं बोलणं केव्हा झालं होतं ते सांगितलं. “मी त्यांच्याशी ४ ते ५ महिन्यांपूर्वी फोनवर बोललो होतो. आम्ही जवळपास एक तासाहून जास्त वेळ बोलत होतो. त्यांनी मला खूप प्रेरित केलं. मी त्यांना माझ्या स्वप्नांबद्दल सांगितलं. मला त्यांची खूप आठवण येत होती, कारण आम्ही एकत्र काम करत नव्हतो, त्यामुळे मी त्यांच्याशी बराच वेळ बोलत होतो,” असं समय शाह म्हणाला.

बेपत्ता गुरुचरण सिंगचं लग्न अन् आर्थिक अडचणींबाबत कुटुंबियांनी सोडलं मौन, म्हणाले…

गुरूचरण सिंग नैराश्यात असल्याच्या बातम्या येत आहेत, त्याबाबत समयने मत व्यक्त केलं. “आम्ही बोललो तेव्हा ते खूप आनंदी होते. ते नैराश्यात होते, असं लोक म्हणतायत त्यावर मला अजूनही विश्वास बसत नाही. जेव्हा जेव्हा माझं त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा ते खूप नम्रपणे बोलत होते. ते ठिक होते आणि सतत माझी विचारपूस करायचे. ते नैराश्यात होते, असं मला वाटत नाही. मी त्यांच्या मुलासारखा आहे,” असं समय म्हणाला.

गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…

गुरुचरण काय काम करत होता, याबाबत समय शाहने सांगितलं. “त्यांनी आयुष्यात आणि करिअरमध्ये बऱ्याच गोष्टी प्लॅन करून ठेवल्या होत्या. आम्ही जेव्हा बोलायचो तेव्हा मी ते काय करत आहेत, याबद्दल विचारायचो. ते एका पंजाबी चित्रपटावर काम करत होते, पण मला त्याबाबत जास्त माहिती नाही, कारण त्यांना सरप्राईज द्यायला आवडतं. ते काय करत आहेत हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. मला खात्री नाही, पण चित्रपटाचे नाव जीसीएस होते. ते एका ॲपवरही काम करत होते. मला वाटतंय ते लवकरच परत येतील आणि मला त्यांना लवकरात लवकर भेटायचं आहे,” असं समयने सांगितलं.

“दिलीप जोशींच्या मुलाच्या लग्नात…”, ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरची बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल प्रतिक्रिया

यावेळी समयने गुरुचरणसाठी एक मेसेज दिल आहे. “मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की प्लीज मला कॉल करा, काहीही झालं असेल तरी प्लीज मला कॉल करा,” असं तो म्हणाला. दरम्यान, समयबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच इंग्रजी साहित्यात एमए पूर्ण करणार आहे. त्याला भविष्यात लेखन करायचं आहे.