आपल्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी मुग्धा वैशंपायन नेहमी चर्चेत असतात. कामाव्यतिरिक्त ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कायम चर्चेचा विषय असते. सध्या मुग्धा अंदमान टूरवर आहे. या टूरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसत आहे.

२९ फेब्रुवारीला मुग्धाने अंदमानमध्ये पहिल्यांदाच मोदक खायला मिळाल्याचा अनुभव शेअर केला होता. आज मुग्धाला अंदमानच्या सुमद्रात पाय बुडवण्याचा मोहचं आवरला नाही. त्यामुळे तिने समुद्रात पाय बुडवून आनंद घेतला. याच व्हिडीओ मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ आता फुलणार, सागर मुक्तासाठी बनवणार खास पदार्थ

मुग्धा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मला समुद्र अशक्य आवडतो. अंदमानचे सगळे बीचेस विलक्षण सुंदर आहेत. गेली २ वर्ष इतके वेळा अंदमानाला येते आहे. पण कामाच्या निमित्ताने इकडे येत असल्यामुळे एवढ्या वेळा येऊनही कधी समुद्रात गेले नव्हते. पण आज मोह आवरला नाही त्यामुळे पाय बुडवलेच.”

हेही वाचा – Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये जान्हवी कपूरचा रिहानासह ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दरम्यान, याआधी अनेकदा मुग्धा अंदमानच्या टूरवर गेली होती. याचे अनुभव देखील तिने चाहत्यांबरोबर शेअर केले होते. यासंंबंधित फोटो आणि व्हिडीओ व्हायरल देखील झाले होते.

मुग्धाची लव्हस्टोरी

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्येच मुग्धा आणि प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा आणि प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर प्रथमेशने एका कार्यक्रमाच्या तालीमच्या वेळी आवांतर गप्पा झाल्यानंतर मुग्धाला विचारलं. प्रथमेश विचारणार याची मुग्धाला थोडी कल्पना होती. मुग्धाचे उत्तर काय असणार? हे प्रथमेशला माहित होतं. पण तरीही मुग्धाने प्रथमेशला होकार देण्यासाठी तीन-चार दिवस घेतले. मग एकेदिवशी तिने त्याला भेटायला बोलवून होकार कळवला. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करून लागले आणि काही काळाने दोघांनी नात्याबद्दल एकत्र घरच्यांना सांगायचं ठरवलं.