‘झी मराठी’ वाहिनीवर दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या खूप आवडू लागलं आहे. दिवसेंदिवस या मालिकेचा प्रेक्षक वर्ग वाढत आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापटने साकारलेला AJ (अभिराम जहागीरदार) आणि अभिनेत्री वल्लरी विराजने साकारलेली लीला यांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.

सध्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजे म्हणजेच अभिरामच्या लग्नाची तयारी सुरू आहे. साखरपुडा, हळद झाली असून लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. पण अशातच लवकरच एक मोठा ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो नुकताच ‘झी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – “थकलेल्या आभाळाला…”, अभिनेत्री स्पृहा जोशीने बाबांसाठी लिहिलेली सुंदर कविता नक्की वाचा

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या या प्रोमोमध्ये एजेचा मुलगा म्हणजेच दुर्गाचा नवरा किशोर जहागीरदारांच्या घरात परताना दिसत आहे. तेव्हा किशोर स्वतःच्या मनाशी निश्चय करतो की, आता हा किशोर जहागीर एका नव्या रुपात या घरात शिरणार आहे. एजेसारख्या माणसावर समोरून नाही तर पाठी मागूनच वार करायचा असतो. त्यानंतर सरोजिनी आजी किशोरचं स्वागत करतात. मग किशोर आजीच्या पायापाशी बसून म्हणतो की, आजी मी चुकलो गं. तितक्यात एजे तिथे येतो. तेव्हा किशोर एजेचे पाय पकडून माफी मागतो. “बाबा मी खरंच चुकलो”, असं म्हणतो. मग एजे मोठ्या मनाने किशोरला माफ करतो. “हे घर तुझंच आहे” म्हणत दुर्गाला सांगतो, “जसं पूर्वी घर होतं तसंच आजही राहिलं.”

त्यानंतर दुसऱ्याबाजूला लीला किशोरच्या गाडी समोरचं बेशुद्ध होऊन पडते. त्यामुळे किशोर लीला रुग्णालयात दाखल करतो. तेव्हा लीलाचे रक्त रिपोर्ट येतात. ज्यातून लीलाच्या बाबतीतली एक मोठी गोष्ट समोर येते. लीलाला कधीच बाळ होऊ शकणार नाही, हे किशोरला कळतं. त्यामुळे तो आता ठरवतो की, लीलाचं एजेची बायको व्हायला पाहिजे. त्यामुळे आता नक्की कोण एजेची बायको होणार श्वेता की लीला? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: “माधुरी दीक्षितला मागे टाकलंस”, दिशा पटानीच्या मोठ्या बहिणीचा जबरदस्त डान्स व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

हेही वाचा – Video: RCB VS RR सामन्यादरम्यान जान्हवी कपूरवर सेल्फीसाठी चाहत्यांनी फेकले फोन, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत किशोर जहागीरदाराची भूमिका अभिनेता प्रसाद लिमयेने साकारली आहे. काही दिवसांपूर्वी त्याची या मालिकेत दमदार एन्ट्री झाल्याच पाहायला मिळालं.