बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी जितकी तिच्या कामामुळे चर्चेत असते तितकीच तिची मोठी बहीण खुशबू पटानी चर्चेत असते. खुशूब ही माजी भारतीय सैन्य अधिकारी असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. नेहमी फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. कधी बॉक्सिंगचे तर कधी योग व्हिडीओ शेअर करत असते. खुशबचे डान्स व्हिडीओ खूप व्हायरल होतं असतात. काही दिवसांपूर्वी ती एका पंजाबी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसली होती. पण तिला डान्स करताना घातलेल्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलं होतं. सध्या दिशाच्या बहिणीचा आणखी एक डान्स व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे.

खुशबू पटानीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये खुशबू धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या ‘आज नचले’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. खुशबूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. विशेष म्हणजे तिचा हा डान्स व्हिडीओ तिच्या आईने शूट केला आहे, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. खुशबूच्या या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

हेही वाचा – Video: RCB VS RR सामन्यादरम्यान जान्हवी कपूरवर सेल्फीसाठी चाहत्यांनी फेकले फोन, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – घरच्यांचा लग्नाला तीव्र विरोध पण…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने वाचा फिल्मी लव्हस्टोरी

खुशबूच्या या डान्स व्हिडीओवर अभिनेत्री दिशा पटानीसह अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिशाने प्रतिक्रियेत लिहिलं आहे, “हाहा..दी खूप मस्त.” तसंच एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘हे खूप छान आहे. नाहीतर तुमची बहीण तर अंगप्रदर्शन करायचं काम करते. हे संस्कार आहेत.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “जर दिशा पण तुमच्यासारखी संस्कारी असती.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मला नव्हतं माहिती की सैन्यातील लोक इतके छान डान्स करतात.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तू माधुरी दीक्षितला देखील मागे टाकलंस.” अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया खुशबूच्या व्हिडीओवर उमटल्या आहेत.

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात समांथा प्रभूची जागा घेणार ‘ही’ अभिनेत्री? रणबीर कपूरसह इंटीमेट सीन देऊन रातोरात झाली नॅशनल क्रश

खुशबूच्या या डान्स व्हिडीओला २५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख २७ हजारांहून अधिक लाइक्स दिले असून ४ हजारांहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. खुशबूचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ५ लाखांहून अधिक तिचे फॉलोअर्स आहेत.