करण जोहरच्या ‘धडक’ चित्रपटातून पदार्पण करणारी जान्हवी कपूर आता बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री झाली आहे. सध्या जान्हवी ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. शरण शर्मा दिग्दर्शित ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटात जान्हवीबरोबर अभिनेता राजकुमार राव पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या दोघं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. नुकतेच दोघं वाराणसीमध्ये पाहायला मिळाले. अशातच दुसऱ्याबाजूला जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामधील जान्हवीच्या चाहत्यांच्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

नुकताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) सामना पार पडला. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला. हाच सामना पाहण्यासाठी अभिनेत्री जान्हवी कपूर मित्र ओरीबरोबर गेली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. पण यामधील एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. जान्हवी कपूर आणि ओरीचा हा व्हिडीओ ‘बॉलीवूड नाउ’ हा इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – घरच्यांचा लग्नाला तीव्र विरोध पण…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने वाचा फिल्मी लव्हस्टोरी

या व्हिडीओत, जान्हवी कपूरचे चाहते सेल्फीसाठी तिच्यावर फोन फेकताना दिसत आहेत. पण यावेळी ओरी सगळ्यांचे फोन एकत्र करतो आणि चाहत्यांना ते परत करतो. जान्हवीचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

एका नेटकऱ्याने व्हिडीओवर लिहिलं आहे, “सगळे वेडे आहेत का?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हे वाईट आहे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “एका सेल्फीसाठी हे लोक स्वतःच्या फोनची वाट लावत आहेत.”

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात समांथा प्रभूची जागा घेणार ‘ही’ अभिनेत्री? रणबीर कपूरसह इंटीमेट सीन देऊन रातोरात झाली नॅशनल क्रश

दरम्यान, जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिचा राजकुमार रावबरोबरचा चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेज माही’ ३१ मे प्रदर्शित होत आहे. याशिवाय तिचा ‘उलझ’ चित्रपट ५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात जान्हवी भारतीय वन सेवा अधिकारीच्या (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर -IFS) भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा देशभक्तीवर आधारित असून तरुण मुत्सद्दी सुहानाच्या (जान्हवी कपूर) भोवती फिरणारी कथा आहे. ‘उलझ’ चित्रपटात सुहाना देश आणि तिच्या विरोधात रचलेल्या कट उधळवताना दिसणार आहे.

सुधांशू सरिया दिग्दर्शित ‘उलझ’ चित्रपटात जान्हवीबरोबर अभिनेता गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, राजेश तैलंग, मियांग चांग, सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. गेल्या महिन्यात या चित्रपटाचा सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला टीझर प्रदर्शित झाला होता.