‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे डॉ. निलेश साबळे घराघरांत लोकप्रिय झाला. एक दशकाहून अधिक काळ तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. उत्तम सूत्रसंचालनाबरोबरच निलेश हा अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची हुबेहूब मिमिक्री करतो. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी मराठी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर त्यांची मिमिक्री सादर केली होती. याशिवाय निलेश, राज ठाकरे यांची देखील उत्तम मिमिक्री करतो. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. निलेश साबळेने राज ठाकरेंबद्दलचा एक खास किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निलेश म्हणाला, “राजसाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत आणि त्यांना मला दोन ते तीन वेळा भेटता आलं हे माझं भाग्य आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमला त्यांनी एकदा बोलावलं होतं. त्यानंतरही एकदा-दोनदा भेटण्याचा योग आला होता. मध्यतंरी ते नवीन घरात राहायला गेले तेव्हा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना भेटलो होतो.”

हेही वाचा : मृणाल दुसानिसच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? नाव ठेवलंय खूपच खास, पहिल्यांदाच सांगितला अर्थ

अभिनेता पुढे म्हणाला, “त्यांनी मला विचारलं ‘कसं वाटलं नवीन घर?’ मी म्हटलं खूप छान झालंय सर. पुढे, त्यांनी मला विचारलं ‘अरे ते हत्ती कसे वाटले तुला?’ मी सांगितलं ते सुद्धा छान आहेत. ते दोन्ही हत्ती चांदीचे होते. त्यावेळी ते म्हणाले, आता मला एका कार्यकर्त्याचा फोन आला होता. तो म्हणाला साहेब दोन हत्ती पाठवतो त्यावर मी म्हटलं…अरे! दोन आधीच माझ्याकडे आहेत. मग तिसरा कार्यकर्ता सुद्धा हत्तीच पाठवणार होता. शेवटी मी त्यांना म्हणालो, ‘अरे हत्ती खूप झाले आता माऊथ पाठवा म्हणजे झालं.’ ते प्रचंड हजरजबाबी आहेत.”

हेही वाचा : आईने केलं लाडक्या लेकीचं कन्यादान! चेतन-ऋजुताच्या लग्नातील ‘तो’ फोटो चर्चेत, सर्वत्र होतंय कौतुक

“राज ठाकरे हे निश्चितच चांगले राजकारणी आहेत. परंतु, एक कलाकार म्हणून जेव्हा त्यांना भेटण्याची संधी मिळते तेव्हा, ते सगळं बाजूला सारून एक कलाकार म्हणून आमची भेट घेतात. अगदी मित्रासारखे गप्पा मारतात हे आमचं खरंच भाग्य आहे. माझ्या कोणत्याही मिमिक्रीवर ते कधीच चिडले नाहीत. त्यांनी नेहमीच माझं कौतुक केलंय. कारण, ते स्वत: व्यंगचित्रकार आहेत. त्यांच्याप्रमाणे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा व्यंग चित्रकार होते. त्यांचंही प्रत्येक कलाकाराशी एक वेगळं बॉण्डिंग होतं. राजसाहेबांचं सुद्धा तसंच आहे. त्यांना कलाकारांची जाण असल्याने मला नाही वाटत ते भविष्यातही कधी मिमिक्री केल्यावर चिडतील.” असं निलेश साबळेने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh sable recalls meeting raj thackeray at his new house shares funny incident sva 00
Show comments