आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणारी आणि ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे. २०२०मध्ये कार्तिकीने रोनित पिसे याच्याशी लग्नगाठ बांधली होती. पुण्यात पारंपरिक पद्धतीने, मोठ्या थाटामाटात कार्तिकी-रोनितचा लग्नसोहळा झाला होता. आता लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी-रोनित आई-बाबा होणार आहेत.

काही दिवसांपूर्वी कार्तिकीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो शेअर करत कार्तिकीने आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत आहे. अशातच सध्या कार्तिकीचा डोहाळे जेवणाचा एक युट्यूब व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये कार्तिकीच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.

mugdha vaishampayan shares a photo with prathamesh mother
मुग्धा वैशंपायन सासूबाईंना ‘या’ नावाने मारते हाक, वाढदिवशी शेअर केलेली पोस्ट चर्चेत
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Mugdha Vaishampayan congrats to Kartiki Gaikwad after pregnancy announcement
कार्तिकी गायकवाडने आनंदाची बातमी देताच मुग्धा वैशंपायन झाली भावुक, म्हणाली, “खूप…”
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

हेही वाचा – कार्तिकी गायकवाडला होणाऱ्या बाळाकडून आहे ‘ही’ अपेक्षा, म्हणाली, “मुलगा होणार की मुलगी यापेक्षा…”

‘समर्था खेसे (Madhuri Khese)’ या युट्यूब चॅनलवर कार्तिकीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये कार्तिकीच सुंदर घर पाहायला मिळत आहे. कार्तिकीच्या घराच्या प्रवेशद्वारावर मोठी पाटी आहे. कृष्णाई संगीत शिक्षण संस्था गायक व संगीतकार पंडीत कल्याणजी गायकवाड निवास, असं त्या पाटीवर लिहिण्यात आलं आहे. पहिल्या मजल्यावर कार्तिकीची प्रशस्त रुम आहे.

फोटो सौजन्य – समर्था खेसे (Madhuri Khese) युट्यूब चॅनल

गायिकेच्या घरातील हॉलमध्ये चारही बाजूला सन्मान चिन्ह आहेत. तसेच वाद्य देखील आहेत. बालपणीच्या सुंदर क्षणांचे फोटो फ्रेम लावण्यात आले आहेत. एका फोटो फ्रेमवर आठवण सोनेरी क्षणांची असं लिहिण्यात आलं आहे. या फोटो फ्रेममध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे, निळू फुले, अशोक सराफ यांच्यासह चिमुकली कार्तिकी दिसत आहे.

फोटो सौजन्य – समर्था खेसे (Madhuri Khese) युट्यूब चॅनल
फोटो सौजन्य – समर्था खेसे (Madhuri Khese) युट्यूब चॅनल

कार्तिकीची बेडरुम देखील हॉलप्रमाणेच सुंदर आहे. बेडरुममध्ये विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती, फोटो आहेत. शिवाय वडील कल्याणजी गायकवाड यांचा देखील फोटो दिसत आहे. कार्तिकीचं हे संपूर्ण घर मधुरा खेसेच्या युट्यूब व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, कार्तिकीला सध्या सातवा महिना असून मे महिन्यात ती एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.

हेही वाचा – कार्तिकी गायकवाडने आनंदाची बातमी देताच मुग्धा वैशंपायन झाली भावुक, म्हणाली, “खूप…”

फोटो सौजन्य – समर्था खेसे (Madhuri Khese) युट्यूब चॅनल

कार्तिकी गायकवाडचा नवरा कोण आहे?

कार्तिकीचा नवरा रोनित हा पुण्याचा असून मॅकेनिकल इंजिनिअर आहे. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. याशिवाय शेअर मार्केटिंग संबंधित रोनितचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात.