Titeeksha Tawde And Siddharth Bodke Wedding: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे आज लग्नबंधनात अडकली. अभिनेता सिद्धार्थ बोडकेशी तितीक्षाने लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या दोघांवर मराठी कलाकारांसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल झाले असून नुकताच अभिनेत्रीने लग्नाचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काल, २५ फेब्रुवारीला तितीक्षा व सिद्धार्थचा साखरपुडा व हळदीचा समारंभ पार पडला. त्यानंतर आज दोघांचा लग्नसोहळा मोठा थाटामाटात झाला. तितीक्षा आता बोडकेंची सून झाली आहे. ती लग्नाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आम्हाला मिस्टर अँड मिसेस म्हणा.”

हेही वाचा – तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला ‘बिग बॉस १७’मधील लोकप्रिय जोडीची हजेरी, फोटो शेअर करत दिल्या मराठीतून शुभेच्छा, म्हणाले, “एक स्वप्न…”

या व्हिडीओत, तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नातील काही खास क्षण पाहायला मिळत आहे. या क्षणादरम्यान तितीक्षाला अश्रू अनावर झाल्याच दिसत आहे. लग्नासाठी दोघांनी खास पेस्टल रंगाची निवड केली होती. अभिनेत्रीने ऑफ व्हाइट आणि गोल्डन किनार असलेली नऊवारी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतरं घातलं होतं. दोघं या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते.

हेही वाचा – पंकज उधास यांची पत्नी फरीदाशी ‘अशी’ झाली होती पहिली भेट, जाणून घ्या काय करतात त्यांच्या मुली?

दरम्यान, तितीक्षा व सिद्धार्थ यांच्या या लग्नाच्या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आशुतोष गोखले, गौरी कुलकर्णी, ऋतुजा बागवे, ऐश्वर्या नारकर, रेवती लेले, राधा सागर अशा अनेक कलाकारांनी दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.