स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’, ‘रंग माझा वेगळा’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली. या मालिकांमधून विविध विषयांवर भाष्य करण्यात आलं. पुन्हा एकदा ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही नवी कोरी मालिका स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

स्टार प्रवाहच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन नव्या मालिकेचा प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. विवाहित मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. याची झलक व्हिडीओत पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाहवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेचा प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

_Morgan spurlock exposes fast food industry
‘मॅकडोनाल्ड’ कंपनीला दणका देणारे मॉर्गन स्परलॉक कोण होते?
kiran mane shared Janhvi Kapoor video
“बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये ‘गांधी-आंबेडकर’ यांच्याविषयी बोलताना कुत्सित…”, जान्हवी कपूरचा व्हिडीओ शेअर करत किरण मानेंचं वक्तव्य
actor rohan patil who played role of manoj jarange share experiences during movie to media representatives
मनोज जरांगेची भूमिका करणारा अभिनेता म्हणाला ” दोनच दिवस उपाशी…”
manoj bajpayee
दिल्ली आवडते की मुंबई? अभिनेता मनोज बाजपेयींनी त्यांच्या खास शैलीत दिलं उत्तर; म्हणाले…
colors marathi this serial going off air soon
कलर्सची ‘ही’ लोकप्रिय मालिका वर्षभरातच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांच्या पोस्टने वेधलं लक्ष
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Kapil Honrao Play New Role In New Marathi Serial Jai Jai Shani Dev
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता झळकला नव्या मालिकेत, पाहा नवं रुप
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान

हेही वाचा>> “मी मामावर खूप प्रेम करतो, पण…” गोविंदाबरोबरच्या वादावर कृष्णा अभिषेकची प्रतिक्रिया, म्हणाला…

मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्या पुगावकर ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत ती आनंदी ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. नव्या भूमिकेबद्दल दिव्याने तिचं मत व्यक्त केलं.

हेही वाचा>> “मी पोलिसांत भरती झालो होतो, पण…” नागराज मंजुळेंचा खुलासा, म्हणाले “दहावीनंतर…”

दिव्या म्हणाली, “मुलगी झाली हो मालिकेत न बोलता खूप काही व्यक्त करण्याचं आव्हान होतं. या मालिकेत मी बोलणार तर आहे पण मनात खूप साऱ्या भावना साचवून. त्यामुळे आनंदी ही व्यक्तिरेखा एक अभिनेत्री म्हणून जास्त आव्हानात्मक आहे.” ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका ८ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायंकाळी ६.३०वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.