महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ‘स्टार प्रवाह’वर येत्या काळात दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेता विशाल निकम, जय दुधाणे व अभिनेत्री पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका २७ मे पासून रात्री १० वाजता सुरू होणार आहे. तर अभिनेत्री शिवानी सुर्वे व मानसी कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही नवी मालिका १७ जून पासून रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे. पण या दोन नव्या मालिकांमुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील दोन जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘पिंकीचा विजय असो’ आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या दोन लोकप्रिय मालिका बंद होणार आहेत. अद्याप ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका ऑफ एअर होणार असल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण ‘पिंकीचा विजय असो’ मालिका बंद होणार असल्याचं निश्चित झालं आहे. २६ मेला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.

हेही वाचा – Video: एक बार देख लीजिए…; जुईली जोगळेकरने गायलं ‘हीरामंडी’तील लोकप्रिय गाणं, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

‘पिंकीचा विजय असो’ मालिकेचा महाअंतिम भागाने शेवट होणार आहे. येत्या २६ मेला दुपारी २ आणि ८ वाजता या मालिकेचा शेवटचा भाग पाहायला मिळणार आहे. याचा प्रोमो मालिकेच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये बापूंनी रचलेल्या डावाला धोंडे-पाटील कुटुंब एकत्र सामोरे जाताना दिसत आहेत. बापूंनी हारामध्ये बॉम्ब ठेवला असतो. जो पिंकीकडे असतो पिंकी तो हार घेऊन सगळ्यांना सावध करते. पण त्यावेळेस पिंकीची सासू म्हणजेच सुशीला तिला मिठ्ठी मारते आणि म्हणते, “मी सुद्धा तुझ्याबरोबर मरायला तयार आहे.” मग त्यानंतर संपूर्ण धोंडे-पाटील कुटुंब पिंकीला साथ देतात. आता हे धोंडे पाटील कुटुंब बापूंचा डाव त्यांच्यावरच उलटून लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: सतत आयपॅड बघत असल्यामुळे लेकीवर ओरडली क्रांती रेडकर, पण मुलीने दिलं जबरदस्त उत्तर, पाहा व्हिडीओ

कोठारे व्हिजन निर्मित ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका जानेवारी २०२२ पासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या मालिकेत केंद्रबिंदू असणारी भूमिका ‘पिंकी’ ही पूर्वी अभिनेत्री शरयू सोनावणे साकारायची. पण तिची गेल्यावर्षी अचानक मालिकेतून एक्झिट झाली. पण याचा परिणाम मालिकेच्या प्रेक्षकांवर झाला नाही. कारण अभिनेत्री आरती मोरेने ‘पिंकी’ची भूमिका उत्कृष्टरित्या पेलली आहे. शिवाय मालिकेतील इतर कलाकार मंडळींनी देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ‘पिंकीचा विजय असो’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण आता २६ मेला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star pravah serial pinkicha vijay aso last episode on 26 may pps